माध्यमिक विद्यालय नगांव गडखांबच्या
खेळाडूंची विभाग स्तरावर निवड
![]()

माध्यमिक विद्यालय नगांव गडखांबच्या
खेळाडूंची विभाग स्तरावर निवड
अमळनेर प्रतिनिधी
आज दि.10/10/2023 रोजी संपन्न झालेल्या जळगाव जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धेत माध्यमिक विद्यालय नगाव गडखांब तालुका – अमळनेर येथील 14 वर्षाआतील गटात १) देवयानी संदीप पाटील- 400 मी धावणे- प्रथम क्रमांक उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला विजयी खेळाडूंचा सत्कार मा. श्री. राजेशजी जाधव सर (सचिव – जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन) यांच्या हस्ते करण्यात आला.
या खेळाडूंचे सुयोग शिक्षण मंडळांचे अध्यक्ष बापूसाहेब डाॅ एन आर पाटील,माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तथा मुख्याध्यापक श्री तुषार नारायण बोरसे यांनी अभिनंदन केले या खेळाडूला शाळेचे क्रीडा शिक्षक एस.एल.मनुरे मार्गदर्शन लाभले.
वरील खेळाडूंची नाशिक विभाग स्तरावर निवड झाली असून पुढील स्पर्धेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

