1 min read

क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळाच्या वतीने डॉ योगेश महाजन यांचा सत्कार

Loading

क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळाच्या वतीने डॉ योगेश महाजन यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ,शैक्षणिक गुणगौरव समिती, माळी समाजाचे भूषण मा. श्री. प्रभाकरराव चव्हाण शिरपूर ,श्री.क्षत्रिय काच माळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष व सर्व पंच कमिटी शिरपूर,यांच्या हस्ते अण्णासाहेब डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर यांचा पीएच.डी मिळाल्याबद्दल भव्यदिव्य सत्कार करण्यात आला
पारोळा येथील परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळाचे अध्यक्ष मा. डॉ. श्री.योगेश रघुनाथ महाजन सर यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी,युनाइटेड स्टेटस ऑफ अमेरिका विद्यापीठातर्फे (पी.एच.डी) डॉक्टरेट, सामाजिक सेवा (विशेष शिक्षण आणि दिव्यांग सेवा ) गोवा कॅन्डोलीम येथे (पीएच.डी) डॉक्टरेट, बहाल करण्यात आली. त्याबद्दल श्री क्षत्रिय माळी समाज पंच मंडळाचे कार्याध्यक्ष मा. श्री. प्रभाकरराव तुकाराम चव्हाण,क्षत्रिय माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष व सर्व पंच कमिटी शिरपूर, सावित्रीबाई फुले महिला मंडळ शिरपूर , गुणगौरव समितीचे अध्यक्ष मा. श्री. संजय आत्माराम चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष. श्री. बाबूलाल महाजन, विलेपार्ले केलवानी मंडळाचे उपाध्यक्ष व शिरपूर टेक्सटाईल पार्कचे चेअरमन मा. श्री चिंतनभाई पटेल, शिरपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक पी आय मा.श्री. अन्साराम आगरकर, धुळे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष मा. श्री. देवेंद्र पाटील, पारोळा येथील परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळाचे अध्यक्ष मा. डॉ. श्री.योगेश महाजन, भाजपा डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल बडगुजर, कळमसरे गावाच्या उपसरपंच सौ. मंदाताई माळी व माळी भूषणचे संपादक श्री.प्रा.भीमराव महाजन, यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य यशाबद्दल सत्कार करण्यात आला.
श्री क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ, शैक्षणिक गुणगौरव समिती, माळी समाजाचे भूषण मा.श्री.प्रभाकरराव चव्हाण शिरपूर यांच्या हस्ते माझा भव्यदिव्य सत्कार केला.त्याबद्दल मी भारावून गेलो आपले सर्वांचे आशिर्वाद ,समाजाचा जिव्हाळा सदैव मला या दिव्यांग सेवेत प्रेरणादायी ठरेल.मी माळी समाजाचे भूषण मा. श्री. प्रभाकरराव चव्हाण शिरपूर यांचा,श्री क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष व सर्व पंच कमिटी शिरपूर, सावित्रीबाई फुले महिला मंडळ शिरपूर व आपला सर्वांचा आभारी आहे असे सत्कारमुर्ती डॉ योगेश महाजन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *