1 min read

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश 20% अनुदानाचे आदेश लवकरच प्राप्त होतील हजारो शिक्षकांचा परिवारात आनंदाचे वातावरण

Loading

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश 20% अनुदानाचे आदेश लवकरच प्राप्त होतील हजारो शिक्षकांचा परिवारात आनंदाचे वातावरण

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 20% अनुदानावर आलेल्या शाळेमधील शिक्षक शिक्षकेतरांना हक्काचा पगार मिळावा म्हणून, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सातत्याने प्रयत्न करत होते.
शुद्धिपत्रक न निघाल्याने. शिक्षण विभागाकडून कारवाई होत नव्हती , शेवटी आज 10 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभाग ठाणे येथे आमदार महोदय यांनी शिक्षकांसह आंदोलन केले.
जिल्हा परिषदचेे सीईओ, तसेच डेप्युटी सी इ ओ, व शिक्षणाधिकारी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून ,आजच अनुदानाचा आदेश पाहिजे असा हट्ट आमदारांनी धरला, परंतु जिल्हा परिषद मधील जावक रजिस्टर गहाळ झाल्याने शिक्षण विभागाकडून जी चौकशी समिती नेमली त्याचा अहवाल सादर करण्यासाठी अजून-पाच दिवस लागतील, “आम्हास मुदत वाढ द्यावी” असे डेप्युटी सीओ व, शिक्षणाधिकारी आणि आमदार महोदयांना आणि उपस्थित सर्व शिक्षकांना विनंती केली,
अनुदानाचे आदेश पुढील सोमवारी 16 ऑक्टोबरला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या हस्ते वितरित केले जातील, तसेच शालार्थाचे प्रस्ताव एका आठवड्यात पूर्ण करून पुढील महिन्यात दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होईल, याची शाश्वती दिली, त्यामुळे आजचे आंदोलन स्थगित केले.
त्यामुळे ठाणे पालघर मधील शिक्षकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे, जवळपास 650 पैकी 321 शिक्षकांचे 11 पैकी सहा मुद्दे जुळत आहेत, उर्वरित शिक्षकांच्या मुद्द्यांमध्ये त्रुटी , त्या त्रुटी समजून घ्याव्यात व सर्व शिक्षकांना अनुदान मिळावे म्हणून आमदार ज्ञानेश्वर मात्र सरांनी चार शिक्षक प्रतिनिधी म्हणून अपात्र शिक्षकांच्या फाईल तपासण्यासाठी दिले आहेत, यांच्या त्रुटी असतील त्यांनी दोन दिवसात आपल्या त्रुटी जिल्हा परिषद ला पूर्तता करावी त्याकरता चार प्रतिनिधी आपल्याला त्रुटी कळवतील.
तसेच ठाणे , पालघर बरोबर रायगड व अन्य जिल्ह्यातील 20% अनुदानाचे आदेश प्राप्त झाले नाही तिथे सुद्धा अशाच प्रकारची धडक दिली जाईल असे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सांगितले.
अशी माहिती गणेश पाटील अध्यक्ष ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्याकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *