वक्तृत्व स्पर्धेत सलग तीन वेळा प्रताप महाविद्यालयाचे यश
![]()

वक्तृत्व स्पर्धेत सलग तीन वेळा प्रताप महाविद्यालयाचे यश
अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध वक्तृत्व स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्रातील मानाच्या आणि प्रसिद्ध वक्तृत्व स्पर्धा घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाने विजयी होऊन प्रताप महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. त्याअनुषंगाने त्यांचा प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांनी सत्कार केला.
जयहिंद संस्थेच्या झूलाल भिलाजी महाविद्यालय, धुळे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत निर्भय धनजय सोनार याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचार प्रशाळा आयोजित महात्मा गांधी सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक अमोल दिलीप पाटील, द्वितीय क्रमांक पूजा हरीलाल पाटील आणि तृतीय क्रमांक निर्भय धनंजय सोनार या विद्यार्थ्याने प्राप्त केला.
चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालय आयोजित वक्तृत्वस्पर्धेत अमोल दिलीप पाटील प्रथम, सागर कोळी द्वितीय आणि सुमित महाजन याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाली.
या सर्व विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. डॉ. कल्पना पाटील, डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. विजय तुंटे, डॉ. मुकेश भोळे, प्रा. मनोहर सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक राकेश निळे, यांनी अभिनंदन केले.
वाद-विवाद मंडळ प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे व समिती सदस्य डॉ. दीपक पाटील, प्रा.योगेश पाटील, प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा. किरण सूर्यवंशी, प्रा. विजय साळुंखे, डॉ. रवींद्र मराठे, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. रमेश माने या समिती सदस्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

