1 min read

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत प्रकाश वाघ यांनी सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केद्राला दिली११ हजांराची पुस्तके भेट…

Loading

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत प्रकाश वाघ यांनी सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केद्राला दिली११ हजांराची पुस्तके भेट…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत स्पर्धा परीक्षेतील मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र अमळनेर येथील संचालक विजयसिंह पवार यांना ११ हजार रूपायांचे पुस्तके भेट दिली.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…
सविस्तर माहिती अशी कि पू. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस माननीय श्री प्रकाश वाघ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाला सतरा हजार चारशे रुपयांची स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट दिली. १० ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे त्यापूर्वीच त्यांनी पुस्तके भेट देऊन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात पुस्तक रुपी प्रकाश निर्माण केला आहे.ही सर्व पुस्तके यूपीएससी व एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूपच मार्गदर्शक ठरणार आहेत दर रविवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयातर्फे ही पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आज एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा वाढदिवस दोन दिवस आधीच साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे हे होते. श्री सोनवणे म्हणाले की केंद्रातील विद्यार्थ्यांना ग्रंथालयातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करावा तसेच मोठ्या पदावर भविष्यात यश मिळवावे व साने गुरुजी ग्रंथालयाचे नाव मोठे करावे असा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नुकतेच मंत्रालय क्लर्क पदी निवड झालेले उदय सोनार हे व्यासपीठावर उपस्थित होते. उदय सोनार यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळेचे नियोजन कसे करावे पुस्तके कोणती वाचावीत पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा व मुलाखत याची सर्वतोपरी तयारी कशी करावी याबद्दल विद्यार्थ्यांना खूप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांतर्फे श्री प्रकाश वाघ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांनी भेट दिलेल्या पुस्तकांबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले. केंद्र संचालक श्री विजयसिंग पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *