1 min read

आयुष्मान भव मेळाव्यात खाचणे,कुरवेल,तावसे ग्रामस्थांची केली आरोग्य तपासणी.

Loading

आयुष्मान भव मेळाव्यात खाचणे,कुरवेल,तावसे ग्रामस्थांची केली आरोग्य तपासणी.

चोपडा..
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आयुष्यमानभव या कार्यक्रमाच्या अनुषंगाने,
जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर तथा सहायक संचालक,कुष्ठरोग जळगांव-डॉ.जयवंत मोरे यांच्या आदेशानव्ये,
आणि तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या मार्गर्शनाखाली,
प्राआकेंद्र-चहार्डी आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य वर्धीनी उपकेंद्र-तावसे अंतर्गत- खाचने व उपकेंद्र-कुरवेल येथे “माता,बाल आरोग्य, लसीकरण,पोषण सल्ला इत्यादी तपासणी,निदान,उपचार, संदर्भ सेवा, आभा कार्ड,आयुष्यमान कार्ड नोंदणी व वितरण” या आजच्या शिबिराच्या थीम नुसार,
आयुष्मान भव कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
प्रसंगी चहार्डी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी-डॉ.वसंत जाधव,जिल्हा पर्यवेक्षक- विजय देशमुख, हे पर्यवेक्षण करीत असुन,
समुदाय आरोग्य अधिकारी- डॉ.दिपक पाटील, डॉ.प्रिती चौधरी, आरोग्य सेविका- छाया धनगर, आरोग्य सेवक-सुनील महाजन, विशाल पांडे, यांनी गरोदर माता यांच्या रक्तातील हिमोग्लबीनचे प्रमाण, रक्तातील साखरेचे प्रमाण, उच्च रक्तदाब तपासणी करून, वय 18 वर्षांवरील तथा वय 29 वर्षांवरील लाभार्थी यांचे देखील एनसीडी स्क्रिनिग द्वारा तपासणी करण्यात येत असून बाधित असलेल्या लाभार्थ्यांना उपलबधतेनुसार औषोधोपचार देण्यात येत आहे,

खाचणे येथील मेळाव्यासाठी आशा सेविका-छाया पाटील, सुशीला कोळी, अर्धवेळ परिचारिका- कोकिळाबाई, ग्रामपंचायत शिपाई-शंकर शिंदे, पा.पु.कर्मचारी, सुनील ढिवर, अशोक ढीवर, तर
कुरवेल येथून मेळाव्यासाठी आशा सेविका सरला कोळी, रत्नजोत बाविस्कर, छाया पाटील, जयश्री मोरे, कुरवेल अर्धंवेळ परिचारिका, आदींनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *