1 min read

अमळनेर तालुक्यात आमसभा तात्काळ घ्या
गटविकास अधिकारी पंचायत समिती, अमळनेर यांना निवेदन

Loading

अमळनेर तालुक्यात आमसभा तात्काळ घ्या
गटविकास अधिकारी पंचायत समिती, अमळनेर यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी दिनदुबळा गरीब वर्ग हा विविध अडचणीना सामोरे जातांना दिसत आहे. तालुक्याला त्यांचे विव्हळणे कुणीही ऐकायला वाली उरलेला नाही असे अभद्र चित्र अमळनेर तालुक्यात स्पष्ट दिसत आहे. बहुतांश ग्रामीण भागातील जनता अमळनेर शहरात शेतीची कामे सोडून शासकीय दालनात स्वत:च्या कामासाठी हेलपाटे मारतांना दिसतात. आर्थिक परिस्थिती नाजूक असतांना देखील रोज शिदोरी बांधून सरकारी दालनात वेळेवर कामे होत नसल्या कारणे तेथेंच तळहातावर शिदोरी (न्याहारी) खातांना दिसतात. हे बघून आमच्या मनाला वेदना होतात.
वैश्विक महामारी कोरोनाच्या काळात अमळनेर तालुक्यात जेवढे गरीब मृत्यूमुखी पडलेत त्यापेक्षा जास्त प्रमाणात अमळनेर तालुक्यात सर्पदंशाने वेळेवर औषधी प्राप्त न झाल्या कारणे शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील व्यक्ती मृत्युमुखी पडलेत. कष्टकरी शेतकरी बांधवांना जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पूरपरिस्थिती मुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरपाई तब्बल दोन वर्ष होऊनही अद्यापपावेतो मिळालेले नाहीत शासनाच्या या निगरगठ्ठ भूमीकेवर स्थानिक भूमीपुत्रांना व शेतक-यांना बोलायचे आहे. पाडळसरे धरणाचे काम कधी पूर्णत्वास येईल व कधी आमचा तालुका सुजलाम सुफलाम होईल या परीस्थितीवर शेतक-यांना बोलायचे आहे.
५) ग्रामीण भागातील शासकीय वैद्यकीय इस्पितळे व त्यातील कार्यरत यंत्रणा किती ढिम्म आहे या बाबत प्रत्यक्षदर्शी आम्ही गेल्यावर आम्हास कटू अनुभव आला.
६) अमळनेर शहरातील भले मोठे ग्रामीण रुग्णालय यास COVID काळात लाखोंचे व्हेंटीलेटर शासनाने पाठवलेत पण ते गोरगरिबांच्या कामी येत नाही ही प्रचंड मोठी शोकांतिका आम्हास दिसली.
७) अमळनेर शहरातील रस्त्यांचा विकास होतो आहे, खड्ड्यांचा विकास होतो आहे हे कळायला मार्ग नाही.
८) ग्रामीण भागात गाडवाट, पायवाट, शेतातील अतिक्रमणे, गावातील अतिक्रमणे वेळेवर शासकीय यंत्रणेच्या द्वारे न्याय न दिल्याकारणे यावरून मोठ्या संख्येने भाऊ भावात भांडत आहेत. भाऊ-बंदकित हाणामा-या होत आहेत आणि त्याचे पुनर्वसन खून खटल्यात होत आहेत याचे गांभीर्य आपणास आहे का?
९) शहरा मध्ये शासनाकडून आलेल्या करोडोंच्या विकास निधीच्या माध्यमातून रस्त्यावर रस्ते, रस्त्यावर डांबर, डांबरात खड्डे आणि त्यावर निकृष्ट दर्जाच्या ठेकेदारांचे त्यामध्ये अड्डे निर्माण झालेत हे आपणास दिसत नाही काय?
१०) कृषी खात्यात विविध अनुदानित योजना मध्ये कामाच्या बाबतीत तफावती दिसताहेत यावरही प्रकाश टाकायचा आहे हे आपणास दिसत नाही काय?
*घरकुल संदर्भात विविध प्रश्न प्रलंबित.
११) करोडो, अब्जो रुपयांचा शासनाकडून आलेला निधी कुठे झिरपतो आहे? आणि कोणाच्या तुंबड्या भरत आहेत? या सर्व सबंध विविध बाबींची चर्चा गोरगरीब अमळनेरकर यास आम सभेच्या माध्यमातून बोलायची आहे.
१२) तब्बल ५ वर्षे सत्ता पालटूनही दरवर्षी आमसभा घेण्याचा शासन निर्णय असतांना देखील आपण अमळनेरात एकही आमसभा घेतली नाही. आमसभा म्हणजे गोरगरीब कष्टकरी जनता यांना त्यांच्या अडचणी सागण्याकरीता शासनाने तयार करून दिलेले एक स्वतंत्र व्यासपीठच म्हणावे. पण ते व्यासपीठ तालुक्यातील आम जनतेकडून एकही आमसभा न घेता आपण हिसकावले ( लोकशाहीचा घात केला असे समजणे) व अमळनेरच्या जनतेला मूक आणि बधीर केले हे स्पष्ट होत आहे. म्हणून अमळनेर मधील स्थानिक भूमीपुत्रांना आमसभेच्या माध्यमातून आपल्या शासकीय कर्मचा-यांशी संवाद साधायचा आहे. म्हणून आपण कार्यतत्परता दाखवत लवकरात लवकर आम सभेची तारीख घोषित करणार व तालुक्यातील कष्टकरी भूमीपुत्रांना आम सभेच्या माध्यमातून न्याय देणार, अडी-अडचणी सोडविणार अशी आम्ही अपेक्षा बाळगतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील ,अनंत रमेश निकम (उपशहर प्रमुख, शिवसेना उ.बा.ठा.अमळनेर) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *