1 min read

डोंबिवली येथील के. एम.पटेल महाविद्यालायाचा एनएसएस यूनिटची अनोखी समाजसेवा
एनएसएस चा छात्रसैनिकांनी “स्वच्छ्ता हे ब्रीद” ठेवून केलेली समाजसेवा कौतुकास्पद:: डॉ माधूरी नंदरवार

Loading

डोंबिवली येथील के. एम.पटेल महाविद्यालायाचा एनएसएस यूनिटची अनोखी समाजसेवा
एनएसएस चा छात्रसैनिकांनी “स्वच्छ्ता हे ब्रीद” ठेवून केलेली समाजसेवा कौतुकास्पद:: डॉ माधूरी नंदरवार

डोंबिवली (मनिलाल शिंपी)श्री डोंबिवली मित्र मंडळ संचालित मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य आणि विज्ञान,ठाकुर्ली (पूर्व) राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत २०२३-२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या *स्वच्छता हिच सेवा कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या छात्र सैनिकांनी दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी महाविद्याया च्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आणि त्या परिसरातील रहिवाशांना स्वच्छता आणि त्याचे महत्त्व सांगितले. तसेच दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी स्वयंसेवकांनी ठाकुर्ली शहराचा बाजार परिसर स्वच्छ केला आणि त्यांना घराप्रमाणे आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायला प्रोत्साहित देखील केले.दि.२० सप्टेंबर रोजी जेव्हा सगळे विदयार्थी सकाळच्या झोपेत होते तेव्हा हे स्वयंसेवक सकाळच्या वेळेत राहत्या शहरातले रस्ते ,गार्डन ,आजुबाजुचा परिसर स्वच्छ करत होते . दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन बंद पडलेल्या वायरी, चार्जर, म्हणजेच इ-वेस्ट जमा केले. तसेच दि.२५ सप्टेंबर २०२३ महाविद्यालयाच्या मागील उद्यान स्वच्छ केले. आणि २९ सप्टेंबर २०२३ रोजी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान पूर्ण केले व यासाठी,सर्व एनएसएस चे छात्रसैनिक व स्वयंसेवकांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद आणि कौतूकाची थाप मिळाली. छात्र सैनिकांनी तयार करून आणलेल्या कापडी पिशव्या लोकांना वाटून प्लास्टिकचा वापर न करण्याचाही संदेश यावेळी देण्यात आला. दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी ठाकुर्ली येथील चोळेगाव येथील गणपती विसर्जन परिसर आणि आसपासचा परिसर स्वच्छ केला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी खूप मोठ्या प्रमाणात भाग घेऊन समाजात स्वच्छतेविषयी जनजागृती करून प्रोत्साहित केले आणि स्वच्छतेची शपथ घेऊन अभियान पूर्ण केले. आपण असे प्रत्येकाने ठरवले तर आपला देश आपण कचरा मुक्त करू शकतो हे धडे मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य आणि विज्ञान,ठाकुर्ली (पूर्व) यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ लाज न बाळगता किळस न वाटून घेता स्वच्छता अभियान आयोजित करून शिकविले आहे. खरोखरचं या कामगिरी ने संपूर्ण डोंबिवली पुढे एक आदर्श ठेवला आहे.एन एस एस युनिटचा प्रमुख प्रा.अंजू पाल, करिष्मा पाटील आणि पूजा गुप्ता यांनी एनएसएस युनिट चां स्वच्छ्ता अभियान पखावाडा” चे उत्कृष्ट असे नियोजन केले होते. क्रीडा संघटक, प्रा.अनंत उतेकर यांनीही मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *