1 min read

कबचौ उमवि विचार प्रशाळे अंतर्गत गांधी विचार शिबीर संपन्न

Loading

कबचौ उमवि विचार प्रशाळे अंतर्गत गांधी विचार शिबीर संपन्न

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन आणि संशोधन केंद्र यांच्यावतीने दि २ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत गांधी सप्ताह निमित्ताने एक दिवसीय ‘गांधी विचार शिबिर’ अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. म. सु. पगारे (संचालक विचारधारा प्रशाळा कबचौ उमवि, जळगाव) हे होते. प्रा. डॉ. संदीप नेरकर, (अधिसभा सदस्य कबचौ उमवि जळगाव) तसेच प्रा. डॉ. दिलीप गिऱ्हे, (विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
तर वक्ते म्हणून प्रा. नितीन पाटील हे उपस्थित होते. त्यांनी महात्मा गांधींच्या कार्यकर्तृत्ववावर प्रकाश टाकला व म. गांधींच्या विचारांचे महत्व आजही गरजेचे आहे. अशी भावना व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात कबचौ उमवि विचारधारा प्रशाळेचे संचालक डॉ. म. सु. पगारे यांनी प्रशाळे अंतर्गत चालणाऱ्या विविध विभागाची भूमिका कथन करत महात्मा गांधींच्या राष्ट्र उभारणीसाठीच्या योगदानाबद्दल भाष्य केले. शिवाय वेळोवेळी अशा गांधी विचार सभेची नितांत गरज आहे. असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. सचिन नांद्रे, (राष्ट्रीय सेवा योजना विभाग कबचौ उमवि जळगाव), प्रा. डॉ.दिलीप कदम, प्रा. डॉ. महादेव तोंडे, प्रा. डॉ. अस्मिता सरवयिया, प्रा. डॉ. संगिता चंद्राकर हे
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी धनदाई माता कला महाविद्यालय, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर, कला महाविद्यालय मारवड आणि प्रताप महाविद्यालय अमळनेर च्या राष्ट्रीय सेवा योजना एककांचे बहुसंख्य स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक डॉ. दिलीप भावसार, प्रा. डॉ. राधिका पाठक यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक डॉ. उमेश गोगडीया यांनी केले. तर कार्यक्रम समन्वयक, प्रा. डॉ. हेमंत पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. भाग्यश्री जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *