श्रीमती. संगिता बाविस्कर राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित ——-!
![]()
श्रीमती. संगिता बाविस्कर राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित ——-!
अमळनेर येथील श्री एन.टी.मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संगीता बाविस्कर मॅडम यांना नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांना धुळे येथील नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरम तर्फे सदरचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला.
श्रीमती संगीता बाविस्कर मॅडम यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम ,कोरोना काळात केलेली शैक्षणिक सेवा, विविध शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना सतत अनमोल मार्गदर्शन मिळत असते. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची ही राज्यस्तरीय दखल घेण्यात आलेली आहे.
दिनांक १ऑक्टोबर रोजी धुळे येथील अजय लॉन्स, धुळे नगाव येथे पुरस्काराचे वितरण नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल सिताराम पाटील यांच्या शुभहस्ते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.उपशिक्षिका श्रीमती. संगिता बाविस्कर मॅडम यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ व मुंदडा फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश भाऊ मुंदडा, चिटणीस नरेंद्र भाऊ मुंदडा, सहचिटणीस योगेश भाऊ मुंदडा सर्व संचालक, कार्यकारी मंडळ आणि मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, संदीप पवार यांनी अभिनंदन करून अधिक वाटचालीस प्रेरणा दिल्या. त्या निमित्ताने सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने श्रीमती संगीता बाविस्कर मॅडम यांना शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रकाश भाऊ मुंदडा यांनी विशेष दखल घेऊन अभिनंदन करताना आपले हातून असेच तळागाळातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होत राहो ही सदिच्छा व्यक्त केली.
💎💎💎💎💎💎💎💎💎



