शिक्षक मतदार संघातील मतदार पात्रता ठरवा…
![]()
शिक्षक मतदार संघातील मतदार पात्रता ठरवा…
मा. निवडणुक निर्णय अधिकारी साो.,
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ,
नाशिक विभाग यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील मतदार नोंदणीकामी माध्यमिक विभागातील मुख्याध्यापकांना मतदार नोंदणीसाठी अवगत करीत असतांना मतदानास पात्र शिक्षक हा माध्यमिक शाळेतील असावा असे सांगितले. मात्र याचवेळी आपण पोटदुरुस्ती अशीही
केली की, इ. ८ वी पर्यंत शिक्षण देणारा शिक्षक हा प्राथमिक शिक्षक म्हणून गणला जाईल व यासाठी
आपण दि. १३ फेब्रुवारी २०१३ चा शासन निर्णय देखील सुचित केला. मात्र आम्ही निदर्शनास आणुन देतो की, महाराष्ट्रभरात इ. ५ वी ते १० वी माध्यमिक विद्यालय असते तसेच इ. ८ वी ते १० वी माध्यमिक
विद्यालय असते तद्वतच इ. ८ ते १२ वी माध्यमिक विद्यालय असते व अशा माध्यमिक विद्यालयात अध्यापन करणारे शिक्षक हे माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांची गणना होऊन ते शिक्षक मतदार संघातील
पात्र मतदार म्हणुन आजपर्यंत मतदान करीत आले आहेत. तरी कृपया आपण महाराष्ट्रभरातील ८०% शाळा या इ. ५ वी ते १० वी, इ. ८ वी ते १० वी अशा आहेत. आपण वरीलप्रमाणे मतदार पात्रता
ठरविल्यास जवळजवळ ४५% शिक्षक मतदार हा मतदानापासुन वंचित राहु शकतो. म्हणुन आपण असा
कुठलाही नियम न लावता माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकाने त्यांच्या आस्थापनेवरील शिक्षकांची
यादी अथवा मतदार नोंदणीचा फॉर्म आपल्याकडे सही शिक्क्यानिशी दाखल केल्यास त्यांना मतदार यादीत समाविष्ट करावे अन्यथा शिक्षक वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण होऊन हरकतींचा पाऊस आपल्या निवडणुक प्रक्रियेत कोसळेल व न्यायालयीन प्रक्रिया उदभवू शकते. तरी कृपया ही निवडणुक
न्याय्य पध्दतीने पार पडण्यासाठी आपण माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांचे सहीशिक्क्यानिशी आलेले अर्ज हे शिक्षक मतदार म्हणुन ग्राह्य धरावे व सदरील माहिती निवडणुक आयोगापर्यंत पोहचवून खालील सही करणाऱ्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना कळवाव्यात.
असे माजी आ. नानासाहेब बोरस्ते
अध्यक्ष, महाराष्ट्र टीडीएफ श्री. संदिप घोरपडे कोषाध्यक्ष, महाराष्ट्र टीडीएफ, श्री. हिरालाल पगडाल
महासचिव, महाराष्ट्र टीडीएफ श्री. संजय पवार नाशिक विभाग, टीडीएफ
श्री. आर. डी. बोरसे जिल्हाध्यक्ष, शिक्षकेत्तर संघटना, जळगांव ,सानेगुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे,.बी.के सूर्यवंशी, एस.एस.सुर्यवंशी, सौ एम वाय वंजारी, व्ही आर चौधरी , गणित मंडळाचे समन्वयक डी.ए धनगर ,विज्ञान मंडळाचे समन्वयक डी के पाटील, साने गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एम ए पाटील, माध्यमिक शिक्षक कैलास पाटील, टीडीएफ चे कार्याध्यक्ष उमेश काटे योगेश्वर विद्यालयाचे प्राचार्य के डी पाटील, डि.बी.सोनवणे,प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमोदीनी.बी.पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भागवत गुरुजी, एस.सी.तेलेसह व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी केले आहे.
व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी केले आहे.

