अमळनेर नाट्यगृहात मोरया नाट्य संस्थेच्या वतीने तीन दिवसीय बासरी वादन शिबीराचे आयोजन.
![]()
अमळनेर नाट्यगृहात मोरया नाट्य संस्थेच्या वतीने तीन दिवसीय बासरी वादन शिबीराचे आयोजन.
संगित क्षेत्रात आवड असणाऱ्यांनी संपर्क साधावा-संदीप घोरपडे

अमळनेर प्रतिनिधी-
दि. ६,७,८ ऑक्टोबर २०२३ या सलग तीन दिवस बासरी वादन शिबीराचे
आयोजन नाट्यमंदिर संचालक श्री. हेमकांत पाटील व जेष्ठ रंगकर्मी श्री. संदिप
घोरपडे सर यांना केले आहे. त्या साठी बासरी मार्गदर्शक खान्देशातील प्रसिद्ध बासरी वादक तसेच बासरी प्रचार व प्रसारक बासरी वादक योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. योगेश पाटील हे गेल्या पंधरा वर्षांपासून बासरी प्रचार व प्रसार साठी खान्देशा सह देशातील बर्याच भागात त्यांचं योगदान आहे. पं. विवेक सोनार यांचे ते शिष्य आहेत. आता पर्यंत दोनशे हुन अधिक बासरी वादन कार्यशाळा त्यांनी घेतल्या
आहेत. जळगाव, नंदुरबार, धुळे तसेच परभणी, पुणे, बडोदा, भोपाल अनेक ठिकाणी यांनी बासरी चे शिष्य घडवले व घडवत आहेत. नुकताच त्यांना जळगाव रोटरी क्लबतर्फे पुरस्कार देण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या जीवनात बासरी शिकणं किती महत्त्वाचे आहे हे देखील ते पटवुन सांगतात. वय वर्ष दहा ते नव्वद पर्यंत चे सगळ्या वयाचे शिष्य त्यांच्या कडे आहेत.गेल्या खुप कालावधी पासुन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर हे
वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. योगा असेल वक्तृत्व असेल किंवा संगीत संमेलन
असेल असे अनेक ऊपक्रम राबवले. श्री. हेमकांत पाटील यांनी सर्वांना आवाहन केले आहे. सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. शिबीर वर्गणी अत्यल्प आहे. असे आवाहन संदिप घोरपडे यांनी केले आहे.

