1 min read

सामाजिक बदलासाठी प्रतिबद्ध : कळमसरे गावाची सुकन्या सौ. संगीताताई पाटील उर्फ बबुताई.

Loading

सामाजिक बदलासाठी प्रतिबद्ध : कळमसरे गावाची सुकन्या सौ. संगीताताई पाटील उर्फ बबुताई.
कळमसरे गावाची कन्या कैलासवाशी डॉक्टर वामनराव पाटील यांची सुकन्या मुंबई स्थित संगीताताई पाटील यांनी सामाज सेवेचा ध्यास घेतला.
समाजाला योग्य ती दिशा दाखवून सामाजिक हक्कासाठी आवाज बुलंद करण्याचा इरादा व ईशाशक्ती त्यांनी. बोलून दाखवली.
मुंबईत मोठंमोठे राजकीय व्यक्तींशी भेट गाठ करून त्यांचा ओळखीचा फायदा त्यांनी समाजाला करून दिला.
विधवा, अनाथ,परितक्त्या स्त्रिया, गरीब, आदिवासी समाजातील मिलींना, तसेच सामाजिक अत्याचार आलेल्या स्त्रियांना न्याय मिळवून द्यायचे कार्य ते कित्येक वर्षांपासून अविरत व अनाहतपणे करत आहेत. कित्येक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे.
गावाचं पांग फेडण्याचा मानस:
संगीताताई ह्या नेहमी म्हणत असत की, गावाचे माझ्याकडे घेणं आहे, या मातीची जाण करून देऊन त्यांनी कलमसरे गावातही सामाज सेवेचा वसा घेतला.
कोरोना काळातली मदत
सौ, संगीताताई म्हणतात की,
” कोरोना काळात माझे गावाचे नागरिक गोर गरीब उपाशी राहू नये, कोणीही उपाशी पोटी झोपू नये, “, या जाणीवेपोटी त्यांनी गोर गरिबांसाठी जीवनश्यक वस्तूंची वाटप सुरु केली.
माझे गावातील माणसं कोरोना मुळे दगावली नाही पाहिजे, गावावर कोरोना महामारीचे संकट यायला नको म्हणून त्यांनी संपूर्ण गाव सानिटीझई करून घेतले.
ज्या गावात कोणी आमदार, खासदार ढुंकूनही बघत नव्हती त्या काळात बबुताई आपल्या घराचा कोणताही विचार न करता आपल्या गावाचा विचार करत होती.
कैरीचे लोणचे :
कलमसरे गावात कैरीचे लोणचे प्रयेकाच्या घरात व्हायला पाहिजे म्हणून निःस्वार्थ भावनेने गावात कैरिंची वाटप केली.
बेरोजगार मुलांसाठीची धडपड
कलमसरे गावातील मुलांना बेरोजगारीचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांनी मुंबईत रोजगारिची अवसर शोधून काढली. तसा रोजगार मेळावा काढला. तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी संधी उपलब्ध करून दिली.
खाऊ वाटप कार्यक्रम
तळागाळातील लोकांच्या मुलांचे पोषण सुधारावे यासाठी ताईंनी खाऊ वाटप कार्यक्रम हाती घेतला.
विविध प्रकारची फळे, ज्यूस, खाऊ, सुकमेवे यांचे भरण पोषण लहान मुलांना केले.
गणपती आरती
सौ, संगीताताई पाटील यांनी मुलांचा उत्साह वाढावा, म्हणून विविध मंडळात जाऊन गणपती आरती केली, तसेच गणेश मंडळाना आर्थिक सहाय्यता दिली.
चर्चा सत्रे :
सौ, पाटील यांनी सामाजिक बदल व्हावा म्हणून लोकांशी हितगुन्ज साधले, त्यांना विविध विषयांची माहिती दिली.
कलमसरे गावातीलकीर्तन सप्ताहात बुंदीरूपी महाप्रसादाची देणगी नुकतीच जाहीर केली.
स्त्रीयांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस :
चूल आणि मूल या पलीकडे जाऊन स्त्रियांनी आर्थिक सक्षम व्हावे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांसोबत काम कराबे. तसेच स्त्रियांना समाजात पुरुषांन इतकेच बरोबरीचे स्थान मिळावे, म्हणून ताईसाहेबांनी स्त्री साक्ष्मीकांरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस नुकताच व्यक्त केला.
टेडी बीअर बनवणे, शिवणक्लास शिकवणे, मेहंदी क्लास सुरु करणे, रांगोळी, चित्रकला, अशा प्रकारांची उपक्रमे हाती घेण्याचे त्यांनी ठरवलेले आहे.
दूध व दूधजन्य पदार्थ बनवणे, तसेच त्यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने तयार करून निर्यात करणे, असे अनेक उपक्रम राबवण्याचे नियोजित आहे.
गाव सुशोभीकरण
कलमसरे गावात स्वछता राखणे
नाले तळे यांची गाळ काढणे, व त्यांची गुणवंत्ता सुधारणे,
स्रियांना मोकळे स्वास घेता यावे व फिरता यावे म्हणू एक मोठा बगीचा व व्यायाम पार्क बनवणे,
जेनकारून स्त्रियांचे आरोग्य चांगले राहील.
उत्तम दर्जाचा दवाखाना सुरु करणे
प्रत्येकाला आरोग्यपूर्ण सुख – सुविधा मिळावीत म्हणून त्यांचा दवाखाना काढण्याची प्रबळ इच्छा आहे. तसें त्यांनी आपल्या मनोगतातही बोलून दाखवले आहे. गरोदर, बाळंत स्त्रिया, तसेच विविध रोगी यांना उत्तम आरोग्य मिळावे म्हणूंन त्या प्रयत्नशील आहेत.
कळमसरे गावात विविध प्रकल्प आणण्याचा ध्यास
कळमसरे गावात विविध उद्योग धने यावेत म्हणून त्या सदैव प्रयत्नशील आहेत. जेणे करून कळमसरे गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील-तालुक्यातील युवकांना रोजगार गावातच मिळेल. तसेच तालुक्याचा भरभरून विकास व्हायला भरपूर मदत मिळेल.
कळमसरे गावातच नव्हे तर अंमळनेर तालुक्यात विकासाची गंगा वाहावी , अशी मामोकामना त्या करत असतात.
सतत हसमुख चेहरा, साधी आणि सरळ राहणी, मन
मिळावूपणा, हळु आणि नम्रततेने बोलणे, मोठ्यांचा आदर करणे,
अबाल वृद्धाशी आपुलकीने विचारपूस करणे, प्रत्येकाचे सुख हे आपले दुःख समजून होईल ती मदत करण्याची इच्छा,
कष्ट, जिद्द, चिकाटी, मुसद्दीपणा, कणखर बाणा, स्पषवक्तेपणा, ध्येय, अनुशासन, काश सहन करण्याची अमाप शक्ती असलेली आमची लडकी ताई,
सौ, संगीताताई उर्फ बबूताई यांचा विषयी जितकं लिहावं तितकं कमीच आहे,.
अश्या कळमसरे गावाची, दुर्गा, झाशीची राणी, सौ, संगीताताई उर्फ
बबूताई
( लेखन, M. E Mahajan
कळमसरे 9370184148)

भावी वाटचालीस संगीता पाटील यांना मराठी लाईव्ह न्युजच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *