1 min read

श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे शाळेत आदिवासी तरुणींसाठी स्वावलंबी शिक्षणाच्या वाटा.. ह्या विषयावर व्याख्यान संपन्न..

Loading

श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक ,तालुका_ अमळनेर, जिल्हा_ जळगाव येथे दि. 1ऑक्टोबर 2023 रोजी “एक तास एक उपक्रम” अंतर्गत आश्रम शाळेमध्ये
आदिवासी तरुणींसाठी स्वावलंबी शिक्षणाच्या वाटा.. ह्या विषयावर व्याख्यानाच आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रमुख वक्ते व मार्गदर्शक आदरणीय हर्षाताई बाळकृष्ण पिसाळ (महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका) यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास आश्रम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री अविनाश अहिरे व श्री उदय पाटील उपस्थित होते. पदवीधर शिक्षिका श्रीमती सविता मुळे मॅडम यांनी आदरणीय हर्षा मॅडमचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.आदरणीय हर्षा पिसाळ मॅडम यांनी आदिवासी आश्रमशाळेतील मुलींशी संवाद साधून त्यांच्यातील बुजरेपणा जाऊन त्यांच्यातली सुप्त कला ,कौशल्य कशी विकसित होतील,त्यांच्यातला आत्मविश्वास कसा वाढेल ,त्या स्वावलंबी कशा बनतील याचे मार्गदर्शन केले.आदिवासी विद्यार्थिनींना भविष्यात कोण, कोणत्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत, त्यांची कौशल्य कोणती व ती कशी हस्तगत करायची याचे अनमोल मार्गदर्शन केले व मी जीवनात स्वावलंबी बनून, मी सुंदरकशी होईन याचा कान मंत्र दिला.हर्षा पिसाळ मॅडम यांनी इयत्ता 8 वी ते12वी वर्गात प्रथम येणाऱ्या मुलींना बक्षीस जाहीर केले व आश्रम शाळेतील मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी शेंगदाण्याची चिक्की घेण्यासाठी आर्थिक मदत केली.समारोपाच्या भाषणात श्री अविनाश अहिरे सर यांनी हर्षा पिसाळ मॅडम यांनी केलेलं मार्गदर्शन आणि दातृत्वाच मन याचं कौतुक केलं व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रवीण पाटील सर यांनी केले .सदर कार्यक्रमास श्री चेतन पाटील सर , श्री आशिष निकम सर , श्री नितीन सोनवणे सर , श्री बी. बी . वानखेडे सर ,श्रीमती माधुरी पाटील मॅडम,श्रीमती विद्या पाटील मॅडम व इतर शिक्षक वृंद हजर होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थिनी विकास समिती व शालेय गुणवत्ता विकास समितीमार्फत करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमात इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. वरील कार्यक्रमास प्रसिद्धि मिळ वण्यासाठी उच्च माध्यमिक शिक्षक श्री स्वप्निल एल.पाटील यांनी सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *