संस्कारासोबत ज्ञानाची शिदोरी जीवनाला नवी वाट दाखवते.
शुभांगीनी महाजन
![]()


संस्कारासोबत ज्ञानाची शिदोरी जीवनाला नवी वाट दाखवते.
शुभांगीनी महाजन
असोदा – शालेय जीवनामध्ये आपल्या अभ्यासक्रमाशी निगडित जीवनाची जडणघडण करीत असताना संस्कारासोबत ज्ञानाची शिदोरी जीवनाला समृद्ध अशी वाट दाखवत असते आणि हा संस्कार साने गुरुजींच्या अनेक गोष्टीतून बालमनावर घडत जातो तो संस्कार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असं मत असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेच्या प्रमुख वक्त्या मराठी विभागाच्या प्रमुख शुभांगीनी महाजन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी शिंपल्यातला मोती ही कथासुद्धा विद्यार्थ्यांना सांगितली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे तर साने गुरुजी कथामालेचे उद्घाटन मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बोलताना त्यांनी साने गुरुजींची धडपडणारी मुले त्यांच्यातला संस्कार आणि ज्ञानार्जन यातून देश अधिकाधिक प्रगत होण्यासाठी प्रयत्नशील राहून एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा हेतू या माध्यमातून साध्य होऊ शकतो विद्यार्थी हा एक आदर्श निर्माण करू शकतो आणि यातूनच मानवी समाजाची वाटचाल ही यशस्वीतकडे होऊ शकते असेही मत त्यांनी याप्रसंगी मांडले. सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामाला या उपक्रमाचा उद्देश बालमनावर संस्कार घडविणे हा असल्याचे उपक्रम प्रमुख भावना महाजन यांनी प्रास्ताविकातून मांडले. याप्रसंगी सुरुवातीला विद्यार्थी सतीश जमरे यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. खरा तो एकची धर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हेमांगी पाटील विद्यार्थिनीने लहानपणापासूनच चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे असा संदेश तिच्या बोधकथेतून दिला.सूत्र संचालन भावना चौधरी यांनी केले तर आभार चारुलता टोके यांनी मानले. मीनाक्षी कोल्हे यांचे सहकार्य लाभले.

