समाज कल्याण न्यास या संस्थेच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील खानिवली गाव व
परिसरासाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न!
![]()


समाज कल्याण न्यास या संस्थेच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील खानिवली गाव व
परिसरासाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न!
ठाणे,भिवंडी ( मनिलाल शिंपी)
भिवंडी तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य समजली जाणारी समाज कल्याण न्यास या संस्थेच्या वतीने खानिवली व परिसरातील गावांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळावा या उद्देशाने समाज कल्याण न्यास
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री सोन्या काशिनाथ पाटील यांनी निस्वार्थ भावनेने रुग्णवाहिका भेट देऊन तिचे लोकार्पण शुक्रवार दिनांक २९/९/२०२३ रोजी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात आले.
खानिवली हा भाग भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात येत असल्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना इमर्जन्सी (अत्यावश्यक सेवा) तातडीची मदत इमर्जन्सीअसले तर उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जाताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. ही बाब खानिवली येथील नागरिकांनी समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या गोष्टीची तातडीने दखल घेऊन सोन्या पाटील यांनी आपल्या स्वखर्चाने खानिवली परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिका भेट दिली असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री विश्वास थळे यांनी यावेळी दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले.
सदर लोकार्पण सोहळ्यासाठी
शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे, जिल्हा प्रमुख विश्वास थळे यांच्या हस्ते, रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.

