स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर गीतांजली रेल्वे कॉलनीतील कचरा उचलला …
![]()

गीतांजली रेल्वे कॉलनीतील कचरा उचलला गेला
गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व
जोगेश्वरी पूर्व गीतांजली रेल्वे कॉलनी येथे प्रचंड प्रमाणात कचरा साचला होता. यामुळे विभागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे, सध्या डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड अशा साथीचे आजार वाढत आहेत अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी अजित भोगले (उबाठा शाखाप्रमुख ५४) यांचेकडे केली होती.भोगले यांनी या तक्रारीची लागलीच दखल घेऊन तो कचरा आज साफ करून घेतला.भोगले एक कर्तव्यदक्ष शाखाप्रमुख म्हणून विभागात ओळखले जातात.

