1 min read

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे पीएम रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धा व पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

Loading

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे पीएम रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धा व पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न
औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर जिल्हा जळगाव येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या वतीने माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि 17/09/23 रोजी पीएम रन फॉर स्किल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री रावसाहेब मांगो पाटील मा. गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती अमळनेर यांच्या हस्ते तिरंगा चौकात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. सदर स्पर्धा 5km अंतराची होती या स्पर्धेत मुले व मुली मिळून 153 स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेतला. या स्पर्धेत पुरुष व महिला गटात प्रथम येणाऱ्यास रुपये 3000 द्वितीय 2000 तृतीय 1000 व प्रमाणपत्र माननीय उपमुख्याधिकारी नगरपालिका अमळनेर मा.श्री गायकवाड संदीप देवाजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2023 परीक्षेत व्यवसाय निहाय प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप मा. गायकवाड साहेबांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रभारी गटनिर्दशक श्री भागवत एस यु, श्री दुसाने ए डब्ल्यू, माळी बीजी, चौधरी पी एस मॅडम ,सौ राणे वाय एन माळी केजी सचिन महाजन अक्षय चौधरी , सागर पाटील साईप्रसाद सर गोसावी मॅडम डी एस पाटील मनोज चव्हाण राजू चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली सूत्रसंचालन श्री वाणी व्ही.पी. यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *