प्रताप महाविद्यालयातील इ.११ वी सायन्स चा विद्यार्थी चि.सुमित महाजन याने एरंडोल नगर परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय
![]()

प्रताप महाविद्यालयातील इ.११ वी सायन्स चा विद्यार्थी चि.सुमित राजेंद्र महाजन याने एरंडोल नगर परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले त्याला रोख बक्षीस स्वरूपात रु. ३,३३३, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र श्री.विकास नवाळे प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल यांच्यातर्फे त्याचा सन्मान करण्यात आला. याबाबत खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिदे, कार्योपाध्यक्ष प्रदिप अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, निरज अग्रवाल, हरि भिका वाणी, संदेश गुजराथी, विनोद पाटील, कल्याण पाटील, संस्थेचे चिटणीस व प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम.जैन सर ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उल्हास जी. मोरे सर ,प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.आर.एम.पारधी सर , प्रा.मंदाकिनी भामरे, प्रा.जी.एल. धनगर,प्रा.देवेंद्र वानखेडे, प्रा.डी.के.तायडे प्रा.आर.एस. महाजन व सर्व शिक्षक बंधू भगिणींनी सदर विद्यार्थ्याचं अभिनंदन व सत्कार केला.

