1 min read

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे शिवरत्न पुरस्कारांची घोषणा

Loading

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे शिवरत्न पुरस्कारांची घोषणा

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची कार्यकारिणीच्या मासिक सभेमध्ये शिवरत्न राज्यस्तरीय पुरस्कार व शिवरत्न अखिल भारतीय पुरस्कार या दोन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली याप्रसंगी कार्यकरिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर नुकतीच झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी फाउंडेशनचे विविध जिल्ह्यांमध्ये व बाहेर सुद्धा मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात येते मराठी भाषा गौरव दिना पासून म्हणजेच दिनांक 27 फेब्रुवारी 2022 पासून या संमेलनाची सुरुवात झाली यावेळी पहिले राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावन भूमीत संपन्न झाले त्यानंतर 5 जून 2022 रोजी कविवर्य बा.भ.बोरकर साहित्य नगरी बोरी फोंडा गोवा या ठिकाणी पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले त्यानंतर 30 ऑक्टोबर 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी पन्हाळागड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले त्यानंतर नुकतेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी व भारताचे संविधान सभेचे सदस्य भवनजी अर्जुनजी खिमजी व्यासपीठ ए.के. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भगवान महावीर भवन खामगाव जिल्हा बुलढाणा येथे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले जे राज्यस्तरीय संमेलन आयोजित करतात त्या एका आयोजकाला शिवरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येईल त्याचप्रमाणे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात त्या एका आयोजकाला शिवरत्न अखिल भारतीय पुरस्काराने गौरवण्यात येणार त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या तीन पदाधिकाऱ्यांना प्रत्येक संमेलनामध्ये तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवा पुरस्काराने गौरवण्यात येणार असेही प्रसंगी डॉ. उज्जैनकर जाहीर केले याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी उज्जैनकर यांच्या निर्णयाला मनापासून टाळ्या वाजवून दाद दिली याप्रसंगी फाउंडेशनचे राज्य सल्लागार तुळशीराम बोबडे राज्य समन्वयक प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया राज्य खजिनदार डॉ. किशोर वानखडे आणि रामदास कोरडे ठाणे जिल्हा समन्वयक रमेशभाऊ उज्जैनकर धाराशिव जिल्हा समन्वयक डॉ.मधुकर हुजरे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख डॉ.लताताई थोरात पुणे येथील रामचंद्र गुरव छत्रपती संभाजी नगर जिल्हा संपर्कप्रमुख एडवोकेट सर्जेराव साळवे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके बुलढाणा जिल्हा समन्वयक पांडुरंग दैवज्ञ साहेब बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहरराव पवार दुसरे जिल्हाध्यक्ष शंकरराव अनासुने जिल्हा उपाध्यक्ष दिनकरराव झनक महिला उपाध्यक्ष पूजाताई खेते जिल्हा सहसचिव प्रदीप मोरे बुलढाणा जिल्हा सदस्य बाळूभाऊ ईटणारे जळगाव जिल्हा महिला संपर्कप्रमुख ज्योतीताई राणे जळगाव जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पोतदार साहेब जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर रोकडे साहेब जिल्हा सचिव गणेश कोळी जिल्हा सहसचिव अश्विनीताई कोळी आदी विविध जिल्ह्यातील पदाधिकारी या झूम मीटिंगला उपस्थित होते या प्रसंगी या मीटिंगचे सूत्रसंचालन राज्य संपर्क समन्वयक प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया यांनी केले तर आभार बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष दिनकरराव झनक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *