भिरडाणे येथे एक गाव एक गणपतीसाठी इंदुबाई प्रतिष्ठान तर्फे 11 हजार रुपयाचे बक्षीस ,,,,,,,,
![]()
भिरडाणे येथे एक गाव एक गणपतीसाठी इंदुबाई प्रतिष्ठान तर्फे 11 हजार रुपयाचे बक्षीस ,,,,,,,,
धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील भिरडाणे येथे गावकऱ्यांनी एक गाव एक गणपती उत्सव साजरा केला यासाठी गावातील गावकरी सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य व गावातील पोलीस पाटील यांनी उतरून यांनी सर्व मंडळाना एकत्र बसवून एक गाव एक उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केला त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी या उत्सवाला प्रतिसाद देत एक गाव एक उत्सव साजरा करून जिल्ह्यात एक आदर्श उभा केला आहे यासाठी गावातील पोलीस पाटील श्री रामकृष्ण अहिरराव आणि गावातील सरपंच श्री राजेश पाटील व गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांनी मेहनत घेतली गावात एक गाव एक गणपती बसवण्यासाठी गावकऱ्यांना आणि तरुण मंडळांना एकत्र आणले गावात एकोपा नादावा उत्सवाच्या आनंदात भानगडी होऊ नये त्यामुळे गावात एकोपा निर्माण होतो तसेच गावात जुनी व वयोवृद्ध ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन तरुणांनाही सोबत घेऊन एक उत्सव समिती स्थापन करून गावकऱ्यांनी एक गाव एक उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केला यावेळी गावात संपूर्ण गाव एकजूट होऊन सकाळ संध्याकाळ आरतीला प्रत्येक गावातील समाजातील व्यक्तींना मान देऊन आरती करण्यात येते
चौकट ,,,,,
मंडळातर्फे दररोज सांस्कृतिक कार्यक्रम निबंध स्पर्धा उपलब्ध स्पर्धा डान्स स्पर्धा तसेच विशेष खेळाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व त्यांच्या गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीसही देण्यात येते होती यावेळी या मंडळांनी वकृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा व बालविवाह मतदानाविषयी जनजागृती ई पिक पाहणी बाबत रात्री मंडळातर्फे जनजागृती करण्यात येते असे मंडळाचे अध्यक्ष हर्षल पाटील यांनी सांगितले
समाज जनजागृती इत्यादी उपक्रम राबवून उत्साहात भर पाडला यासाठी इंदुबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रतिष्ठानकडून प्रतिष्ठानचे सचिव व जि प सदस्य शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी यावर्षी या मंडळाला 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले यावेळी जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष हर्षल पाटील उपाध्यक्ष उमेश पाटील सदस्य किरण पाटील दीपक पाटील सचिन पाटील राकेश पाटील योगेश पाटील आदींनी बक्षिसाची रक्कम समाज उपयोग कार्यक्रमासाठी उपयोगात आणणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले तसेच उत्सवा दरम्यान पारंपारिक वाद्याच्या वापर करून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार विशेष म्हणजे विसर्जित मिरवणुकीत गुलाल चा वापर करणार नसून फुलांचा वापर करून विसर्जन करणार असल्याचे मंडळाचे सदस्यांनी सांगितले यावेळी निश्चित प्रकाश घडू नये यासाठी सरपंच पोलीस पाटील प्रयत्न करीत आहे प्रयत्न केले तरी त्यांना गावकऱ्यांची साथ मिळाली


