प्रताप महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम संपन्न


अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे होते. त्यांच्या हस्ते रिबीन कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजू सरवदे यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले .
प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे उद्घाटकीय भाषणात म्हणाले की, “पोस्टर प्रदर्शनसारख्या कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करणे गरजेचे आहे. कारण अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सूप्त कलागुणांना वाव मिळतो व विकास होतो. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी आणि संशोधन दृष्टी निर्माण होते.” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्राणीशास्त्र विभागातील सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयेश साळवे उपस्थित होते. पोस्टर सादरीकरणात विभागातील पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवलेला होता. सादरीकरणासाठी एकूण पाच बक्षीसे ठेवण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद गावीत यांनी केले तर आभार प्रा. डॉ. ए.जे पाटील यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल असा…
प्रथम क्रमांक : योगीता साळुंखे (एस.वाय.बी.एस्सी), द्वितीय क्रमांक : भाग्यश्री कोळी (एस.वाय.बी.एस्सी) तृतीय क्रमांक : शबीना खान (टी.वाय.बी. एस्सी), उत्तेजनार्थ पारितोषक : पूजा बैसाणे (एस.वाय.बी.एस्सी)
परीक्षक म्हणून सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एस.ए. जोशी व प्रा. हेमलता भोसले हे होते.

