श्रीमती ललिता घ्यार (सौ.ललिता दिनेश पालवे) यांना शिवसेने तर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित
![]()

श्रीमती ललिता घ्यार (सौ.ललिता दिनेश पालवे) यांना शिवसेने तर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित
२४ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार सन्मान
अमळनेर प्रतिनिधी-
श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या शिक्षिका श्रीमती ललिता घ्यार (सौ.ललिता दिनेश पालवे)
जळगांव जिल्हा शिवसेना पक्षा तर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार निवडपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस सागर हिवराळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
श्रीमती ललिता घ्यार गेल्या ११ वर्षापासून शाळेत
गणित विषय शिकवितात.
विद्यार्थ्यांनमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करतात. तसेच करुणा इंटरनॅशनल चेन्नई करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करुणा, शाकाहार,पर्यावरण रक्षण ,जीव दया यावर मार्गदर्शन करतात. त्यांचे पती दिनेश पालवे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस.एस. सूर्यवंशी यांचे नेहमीच त्यांना मार्गदर्शन मिळते.
जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्कार २४ सप्टेंबर ला मंगलमय हॉल कलिंगा माता मंदिराजवळ टाटा मोटर शेजारी नॅशनल हायवे वर जळगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यांचे अभिनंदन खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्षा, विश्वस्त,चिटणीस सर्व संचालक ,सर्व शाळेचे सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, माध्यमिक शिक्षक संघ,कलाध्यापक संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुख्याध्यापक संघ, जळगाव जिल्हा क्रिडा संघटना,,गणित मंडळ, विज्ञान मंडळ,हिंदी अध्यापक मंडळ, शिवशाही फाउंडेशन, माध्यमिक शिक्षक पतपेढी, साने गुरुजी शिक्षक पतपेढी,खा.शिक्षण मंडळ शिक्षक पतपेढी, भाजपा शिक्षकआघाडी, अमळनेर जुनी पेंशन संगटना,
शिक्षक भारती,पोलीस पाटील संघटना, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

