पिळोदे गावाच्या नव नियुक्त पोलीस पाटील लक्ष्मीताई शिंदे यांची आर.पी आय. (आठवले) मराठा/ व्यापारी आघाडीतर्फे जाहीर सत्कार…
![]()
पिळोदे गावाच्या नव नियुक्त पोलीस पाटील लक्ष्मीताई शिंदे यांची आर.पी आय. (आठवले) मराठा/ व्यापारी आघाडीतर्फे जाहीर सत्कार…

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील पिळोदे ग्रामपंचायत येथे प्रथम महिला पोलिस पाटील पदी लक्ष्मीताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली, त्यानिमित्त पिळोदे गावात आर.पी.आय मराठा/व्यापारी आघाडी यांच्या तर्फे सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सरपंच व पोलीस पाटील यांची गावात मिरवणूक काढत प्रथम नवनियुक्त पोलीस पाटील लक्ष्मीताई शिंदे यांचा दादासाहेब साळुंखे तथा ग्रामस्थांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला.तसेच मावळते पोलीस पाटील सुदाम बाविस्कर यांना निरोप देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला होता.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मराठा/व्यापारी आघाडीचे महामंत्री मा. दादासाहेब साळुंखे यांनी ग्रामपंचायत पिळोदे गावातील नवनियुक्त पोलीस पाटील सौ. लक्ष्मीताई जगदीश शिंदे यांचा मोठया कौतुकाने नागरी सत्कार करत भविष्यात आपण आपले कर्तव्य निर्भीड निस्वार्थपणे व निष्ठेने सांभाळून गावाकडे लक्ष द्यावे असे आव्हान करून पुढील वाटचालीस शभेच्छा दिल्या . सत्कार प्रसंगी महामंत्री. दादासाहेब साळुंखे ह्यांनी जळगाव जिल्ह्य़ाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व विषेश कार्यकारी अधिकारी तसेच समस्त जिल्हा प्रशासनाचे देखील आभार मानले प्रसंगी आर. पी .आय मराठा / व्यापारी आघाडीचे नेते हर्षल पाटील, रिपब्लिकन नेते यशवंत बैसाणे, प्रविण पाटील, रविंद्र पाटील, नंदकिशोर पाटील, राजेंद्र शिरसाठ तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमात निवृत्त मुख्याध्यापक तसेच जेष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी श्री. दिलीप ( नाना ) साळुंखे ह्यांनी देखील यांनी देखील आपले विचार व्यक्त केले, लक्ष्मीताई शिंदे ह्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्यात सदर कार्यक्रमात ग्रामपंचायत पिळोदे येथील सरपंच सौ.भारतीताई प्रकाश पाटील, सदस्य आत्माराम पाटील,सौ.कविताबाई संदानशिव, नरेंद्र पाटील माजी पोलीस पाटील श्री. सुदाम बाविस्कर, माजी पोलीस ठाणे अमलदार श्री.मंगलेश शिंदे, तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.चारूदत्त संदानशिव , पत्रकार बांधव व गावातील ज्येष्ठ तसेच इतर ग्रामस्थ यांनी सदर सत्कार समारंभात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली.
खान्देश समाचार,अमळनेर

