1 min read

धनगर जमातीस एस.टी आरक्षणाची अंमलबजावणी करणे बाबत “आसूड आंदोलन”..

Loading

धनगर जमातीस एस.टी आरक्षणाची अंमलबजावणी करणे बाबत “आसूड आंदोलन”..

अमळनेर प्रतिनिधी
आम्ही खालील सह्या करणारे जमात बांधव आपणास विनंती करतो की,महाराष्ट्रातील धनगर समाजाची अनुसूचित गणना होत आहे. परंतु शब्दच्छल करून शासन जाणीवपूर्वक धनगर समाजाचा घटनादत्त अधिकार डावलण्याचा प्रयत्न करत आहे, आगामी काळात धनगर जमातीस एस.टी. आरक्षण मिळाले नाही तर धनगर समाजात शासनाविषयी मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो. कारण 2014 मध्ये बारामती झालेल्या तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणीचे वचन दिले होते. परंतु भाजप सरकार येऊन नऊ वर्षे झालेत तरीसुद्धा आज पावतो धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी झाली नसल्याने धनगर समाजात मोठा असंतोष आहे. तरी धनगर समाजाच्या भावनांचा अंत न पाहता एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
चौंडी ता. जामखेड जि. अहमदनगर येथे गेल्या 6 सप्टेंबर 2023 पासून धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी उपोषणाला बसलेले आहेत. राज्यकर्त्यांनी अजून तरी ठोस भूमिका घेतलेली नाही तरी गेल्या 17 दिवसापासून आमरण उपोषणास बसलेल्या मल्हार सैनिकांशी येथोचित समाज हिताची चर्चा करावी व धनगर समाजाला न्याय द्यावा.
तसेच सोलापूर येथे मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळल्याने धनगर बांधवांना मारहाण करण्यात आली तरी मारहाण करणाऱ्यां दोषींवर शासनाने त्वरित कार्यवाही करावी व धनगर समाजातील होतकरू गरीब बांधवाला न्याय द्यावा.
या मागण्यांसाठी धनगर समाजाने “आसूड आंदोलन”पुकारले आंदोलनात सहभागी धनगर समाज
*मच्छिंद्र लांडगे
डी.ए. धनगर
बन्सीलाल भागवत
नितीन निळे
गोपाल हडपे
आनंदा धनगर
सुरेश न्हाळदे
समाधान धनगर
एस सी तेले
दशरथ लांडगे
हरचंद लांडगे
जिभाऊ कंखरे
भगवान धनगर
आलेश धनगर
अनिल धनगर
मुकेश लांडगे
राजेंद्र शिरसाठ
संजय शिरसाठ
एस एच धनगर
प्रीतम रत्नपारखी
निखिल धनगर
रामचंद्र धनगर
दीपक धनगर
विलास लांडगे
रमेश धनगर
बाळू धनगर
तुषार धनगर
उमेश मनोरे
विजय हिवरे
प्रभाकर लांडगे
सुधाकर पवार
शशिकांत आढावे
पंडित लांडगे
बाळू नाना भागवत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *