1 min read

कर्मवीर अण्णासाहेब भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन——-!

Loading

कर्मवीर अण्णासाहेब भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन——-!
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 22 सप्टेंबर 2023 रोजी अण्णासाहेब कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी “शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म” हे ब्रीद मनाशी बाळगून शैक्षणिक क्रांती अवघ्या महाराष्ट्रभर केली. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे शिल्पकार म्हणून त्यांनी आपला ठसा जन माणसांवर उमटविला. जाती- धर्माच्या शूद्र विचारांना थारा न देता महाराष्ट्राच्या पिढ्या घडविण्याचे काम अण्णासाहेब कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेले आहे .त्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था सुरू करून शैक्षणिक चळवळ पुढे तेवत ठेवलेली आहे.
अशाच प्रकारे आमच्या शाळेतील श्री प्रवीण मगन ठाकरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रेरणा घेऊन शैक्षणिक कार्याला 22 सप्टेंबर 1998 रोजी श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत सुरुवात केली . ‘अपंगत्वावर मात करु, विद्यार्थी माझा कणखर घडवू’ हे ब्रीदवाक्य मनाशी बाळगून त्यांनी आज जवळजवळ 25 वर्ष शैक्षणिक कार्य उत्कृष्टरित्या सुरू ठेवलेले आहे. त्यांनी शैक्षणिक कार्यात लेखन करून विविध लेख, निबंध,आदी लेखन करून वेगवेगळे पुरस्कार व प्रमाणपत्र आधी प्राप्त केलेले आहेत .सदर त्यांच्या कार्याचे कौतुक श्री डी. ए .सोनवणे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना गेल्या पंचवीस वर्षाचा आढावा विद्यार्थ्यांना कथन केला.त्यांच्या या कार्याच्या गुण गौरवासाठी महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ व मुंदडा फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष – प्रकाश भाऊ मुंदडा, चिटणीस- नरेंद्र भाऊ मुंदडा, सहचिटणीस -योगेश भाऊ मुंदडा व सर्व कार्यकारी संचालक मंडळ यांनी सदोदित प्रेरित केलेले आहे. शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार सर यांनी श्री प्रवीण ठाकरे सर यांच्या शैक्षणिक कार्य बाबतीत अधिक प्रेरणा व शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचे हातून असेच विद्यार्थी घडवण्याचं कार्य उत्तरोत्तर होत राहो. ही सदिच्छा व्यक्त केली. सदर प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक डी.एस. माळी वाय.जे. पाटील, ए.पी. जाधव, डी.एस. कारले, एम. एस. सुशीर,पी.ए.शेलकर, आणि शिक्षिका भगिनी सी.डी. निकम ,पी.पी. पाटील,व्ही.डी.जाधव, आणि एस. एस. तेले उपस्थित होत्या. श्री प्रवीण ठाकरे सर यांच्या कार्याच्या बाबतीत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी तेजश्री राकेश धनगर येणे तालासुरात गुरुवंदना म्हटली. ठाकरे सर भाऊक होऊन त्यांनी रोख पारितोषक तेजश्री धनगर हिला जागेवरच दिले. सदरच्या कार्यक्रमासाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे व प्रमोद महाजन रवींद्र चौधरी यांनी सहकार्य केले .कार्यक्रमानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना आणि शिक्षक बंधू भगिनी यांना श्री प्रवीण ठाकरे सर यांच्याकडून चिवडा आणि पेढा पाकीट खाऊ म्हणून वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *