आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिर
![]()


आमदार बाबासो कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिर
अमळनेर, प्रतिनिधी:काॅग्रेसचे नेते आमदार बाबासो. कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १८सप्टेबर रोजी अमळनेरात रक्तदान शिबीर संपन्न झाले.
यात तालुक्यातील रक्तदात्यांनी सहभाग घेतला,या शिबिराचे आयोजन धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रावसाहेब के डी पाटील सर तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटी अमळनेर तसेच महिला शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.
रावसो के डी पाटील सर मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी धुळे जिल्हा ग्रामीणचे आमदार कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात विविध उपक्रम राबविले जातात. यात रक्तदान शिबिर भरवून शंभरहून अधिक रक्तदाते सहभागी होत असतात. तसेच फागणे गटातील बाबासाहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते देखील हिरीरीने भाग घेत असतात.
यावर्षी दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयात हा रक्तदान शिबीराचा कार्यक्रम पार पडला.अमळनेर काॅग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील, जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई वाघ, शहराध्यक्ष प्रा.नयनाताई पाटील यांनी या शिबीरास सहयोग दिला.
याप्रसंगी रोहिदास दाजी मुडीकर, गुलाबराव पाटील (सेवानिवृत्त न्यायाधीश )धनगर आण्णा पाटील, अनिल पाटील पैलाड,राजमल पाटील ,माजी सरपंच पळासदळे,बाळू पाटील पैलाड,शैलेश पाटील पैलाड,गुलाब बापू पळासदळे,मयूर पाटील ,बी के बापू ,श्याम बापू, बन्सीलाल भागवत गुरुजी, राजू दादा फाफोरेकर ,संभाजी पाटील, सुनील पवार, पातोंडा,गिरीश पाटील, नरेंद्र संदानशिव, विनोद भैय्या , मोना पाटील, जुबेर पठाण ,सय्यद तेली ,नैमिक तेली ,जयवंत पाटील, डॉ. अनिल शिंदे, अनिल मुजावर, कुणाल पाटील ,हर्षल जाधव, गजेंद्र साळुंखे , काझी शेख , कुणाल चौधरी, लोटन चौधरी, शांताराम बापू , निळकंठ तात्या , मगन भाऊसाहेब, सोमचंद संदानशिव, सुरेश पाटील ,नितीन पाटील, श्रीराम आप्पा वावडे, अमिन पवार पातोंडा, रहमान खाटीक, प्रताप आबा आंबोरे हाजी जबीर पठाण, मुन्ना शर्मा, प्रा.सुभाष पाटील,संदीप घोरपडे, प्रमोद पाटील,कुणाल चौधरी, पंकज शिरसाळेकर आदी काॅग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

