ऋषिपंचमी निमित्त त्रिवेणी संगमावर अलोट गर्दी—
श्री.क्षेत्र कपिलेश्वर येथे हजारो महिला भाविकानी घेतले दर्शन ——-
![]()
ऋषिपंचमी निमित्त त्रिवेणी संगमावर अलोट गर्दी—
श्री.क्षेत्र कपिलेश्वर येथे हजारो महिला भाविकानी घेतले दर्शन ——-

कळमसरे ता अमळनेर
तापी व पांझरा नदीच्या संगमावर वसलेले कपिलेश्वर महादेवाचे मंदिर हे खान्देशातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.आज ता.20 रोजी भाद्रपत पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या दिवशी मंदिरावर हजारो महिला भाविकानी दर्शन घेऊन नदीवर स्नान केले.
ऋषिपंचमीला अशा पावित्र्य तीर्थस्थानावर स्नान केल्याने, दुख पीडा दूर होऊन संकट नष्ठ होत असल्याची महिमा असल्याने खान्देशाच्या कानाकोपर्यातून महिला भाविकांची गर्दी झाली होती.मंदिराचे मठाधीपती आचार्य महामंडलेश्वर स्वामी हंसानंदजी तीर्थजी महाराज यांनी दुपारी एक ते अडीच वाजे दरम्यान ऋषिपंचमी या महात्म्यामावर प्रवचन केले.नंतर महिलांनी पुजेला सुरुवात केली.कपिलेश्वर ऋषिपंचमी निमित्त मंदिरावर दर्शनासाठी अमळनेर तालुक्यासह जळगाव,भुसावळ,शिरपुर,धुळे,नंदुरबर अशा अनेक ठीकाणाहुन महिला आल्या होत्या. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.मंदिरावर पुजेच्या साहित्याची निम,मुडावद ,अमळनेर येथील दुकाने थाटली होती.

