1 min read

अमळनेरला संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लघु रूद्रा अभिषेक पुजा

Loading

अमळनेरला संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लघु रूद्रा अभिषेक पुजा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
संत गजानन महाराज सेवा संस्थान अमळनेरला संत गजानन महाराजांची113 पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आज माऊलींचा समाधी संजीवन दिवस निमित्ताने पादुकांना लघु रुद्रा अभिषेक पुजा करण्यात आली. व यावेळी प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा. आर बी पवार ,विश्वस्त व महीला वारीप्रमुख सौ ज्योतीताई पवार,गजानन महाराज यांच्या निस्मीम भक्त माई,नितीन भावे गुरूजी ,अशोक भावे गुरूजी,सेवेकरी रघूनाथ पाटील, ह.भ.प पुंडलीक पाटील कळमसरेकर व गजानन परीवारातील बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी अनेक भाविकांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *