स्वामीनारायण मंदिर अमळनेर येथे गणेशोत्सव निमित्ताने युवक पारायणाचे आयोजन
![]()

स्वामीनारायण मंदिर अमळनेर येथे गणेशोत्सव निमित्ताने युवक पारायणाचे आयोजन
अमळनेर येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2023 शनिवार व रविवार या दिवशी गणेशोत्सव निमित्ताने युवक पारायणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये युवकांना संयम व सोशल अवेरनेस(सामाजिक भान)याविषयी तसेच विविध गोष्टींमध्ये आपले आचरण ,आपले विचार कसे असावेत,
अध्यात्मातून आपण आपल्या जीवनाचा विकास कसा साधावा याविषयीचे मार्गदर्शन मिळणार आहे सत्संग व जीवन यांचा मेळ कसा घालता येईल याविषयीचे देखील मार्गदर्शन या दोन दिवशीय युवक पारायण यातून युवकांना मिळणार आहे. तरी १५ ते३०वर्ष वयोगटातील सर्व युवकांनी या पारायणाचा लाभ घ्यावा.पालकांनी आपल्या युवक अवस्थेत असलेल्या पाल्यांना अवश्य पाठवावे.व युवकांनी आपल्या जीवनाचा विकास साधावा असे आवाहन पूज्य योगीस्नेह स्वामी व
पूज्य उत्तममुनिदास स्वामी यांनी केले आहे. पारायणाची वेळ दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत अशी राहील व ठिकाण बीएपीएस स्वामीनारायण मंदिर स्टेशन रोड अमळनेर हे असेल तरी सर्व युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बी.ए.पी.एस स्वामीनारायण युवक मंडळ अंमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

