1 min read

कळमसरेत विजेच्या धक्याने गायीचा जागीच मृत्यू!
नुकसान भरपाईची मागणी

Loading

कळमसरेत विजेच्या धक्याने गायीचा जागीच मृत्यू!
नुकसान भरपाईची मागणी

कळमसरे ता. अमळनेर —येथे गावात विजेच्या धक्याने गायीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल ता.16 रोजी घडली. कळमसरे ता. अमळनेर येथील शेतकरी अशोक रघुनाथ पाटील यांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात दोन गायी, दोन वासरे बांधलेली होती. अशोक पाटील यांच्या अंगणातून महावितरणाच्या विद्युत वाहिनीचा तार गेलेला असल्याने विद्युत खांबावरील तार तुटल्याने गायीचा अंगावर पडल्याने गायीला विजेचा धक्का बसल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. गायीचा ओरडण्याचा आवाज आल्याने अशोक पाटील, राजेंद्र पाटील व गल्लीतील लोकं आल्याने महावीतरण शी संपर्क करून विद्युत पुरवठा बंद करून एक गाय व दोन वासऱ्याना त्या जागेवरून सोडवून त्यांना वाचवीण्यात आले. मात्र आजच दुधाळ गायीचा मृत्यू झाल्याने अशोक पाटील यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यावेळी कळमसरे येथील पशुवैद्यकीय डॉकटर यांनी घटना स्थळी मृत गायीचे शवविछेदन केले. राजेंद्र पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक सुनील तेली हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *