1 min read

नर्मदा शिक्षण प्रसारक संस्था, जळगाव संचलित मातोश्री मीनाताई ठाकरे प्राथमिक तसेच कैलासवासी शेठ दौलत मोतीराम जगताप माध्यमिक आश्रमशाळा केकतनिंभोरे, तालुका जामनेर येथे शाडू माती पासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा

Loading

नर्मदा शिक्षण प्रसारक संस्था, जळगाव संचलित मातोश्री मीनाताई ठाकरे प्राथमिक तसेच कैलासवासी शेठ दौलत मोतीराम जगताप माध्यमिक आश्रमशाळा केकतनिंभोरे, तालुका जामनेर येथे शाडू माती पासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेचे प्रशिक्षक मानव शाळा विद्यालय जळगाव येथील कलाशिक्षक सुप्रसिध्द मुर्तीकार सुनिल जी दाभाडे सर हे होते. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले.
अतिशय सोप्या पद्धतीने गणपती कसा साकारल्या जाईल तसेच कमीत कमी साधनांमध्ये पर्यावरणाला हानी न पोचता शाडू माती पासून गणपती साकारण्याचे कौशल्य त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखवले . मुलांचा उत्साह पाहता सर्वच मुलांनी हिरहिरीने सक्रिय सहभाग घेतला व आपल्या कलाकुसरीतून सुंदर सुंदर अशा पद्धतीने गणेश मुर्त्या तयार केल्या मुलांच्या आनंदाला उधाण आलेलं पाहून सर्वच वातावरण प्रफुल्लित झाले. शाळेच्या अध्यक्षा माननीय काकूसो. शोभनाताई जगताप तसेच मुख्याध्यापक श्री. ए. के. पाटील सर यांच्या हस्ते प्रशिक्षक सुनील दाभाडे सरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक माध्यमिक विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वस्तीगृह कर्मचारी या सर्वांचे मुलाचे योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *