कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती रद्द करा. कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
![]()


कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती रद्द करा. कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ):कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती रद्द करण्याबाबत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदना द्वारे विनंती केली आहे.
शिक्षकांची भरती कंपन्यांद्वारे कंत्राटी पद्धतीमध्ये होणार आहे अशी माहिती सगळीकडे पसरल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे, शिक्षक हा देशाची उज्वल पिढी घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा घटक आहे, विश्वातील या सर्वोच्च घटकाला सर्वच देशांमध्ये सदैव मानाचे स्थान राहिले आहे, कंत्राटी पद्धतीमध्ये शिक्षकांची भरती म्हणजेच शिक्षकांच्या भवितव्यावर गदा येणार असे वाटते म्हणून कंत्राटी पद्धतीने शिक्षक शिक्षकेतरांची भरती करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देऊन विनंती केली असल्याची माहिती
संपर्कप्रमुख विष्णू विशे यांनी दिली आहे.

