1 min read

32 ऑल इंडिया जी. व्ही. मावलंकर शूटिंग स्पर्धेत सार्जंट पुष्पराज नारायण वाघ ने मिळविले 2 सुवर्णपदक

Loading

32 ऑल इंडिया जी. व्ही. मावलंकर शूटिंग स्पर्धेत सार्जंट पुष्पराज नारायण वाघ ने मिळविले 2 सुवर्णपदक

32 ऑल इंडिया जी. व्ही. मावलंकर शूटिंग स्पर्धा आसणसोल वेस्ट बंगाल या ठिकाणी 9 ते 16/09/2023 पार पडली. 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव सार्जंट पुष्पराज नारायण वाघ याने 10 मिटर एअर पिस्तोल उत्तम खेळ दाखवत 376/400 स्कोर केला आणि 17 वर्षाच्या आत व 19 वर्षाच्या आत अशा दोन स्पर्धेत 2 सुवर्णपदक मिळवत 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे नाव वेस्ट बंगालमध्येे गाजवले.
कॅडेट पुष्पराज नारायण वाघ यास कोच दिलीप गवळी सर सचिव जळगाव जिल्हा रायफल असोसिएशन, एएनओ नारायण वाघ सर व क्रीडा शिक्षक श्री वारसे सर यांचे मार्गदर्शन लाभले .श्री राजेंद्र रामराव भोसले मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय सामनेर श्री हेमराज पाटील मुख्याध्यापक विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव एनसीसी समादेशक अधिकारी कर्नल श्री अभिजीत महाजन साहेब व एनसीसी समादेशक अधिकारी लेफ्टनंट कर्नल पवन कुमार साहेब 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी पुष्पराज नारायण वाघ याचे अभिनंदन केले व भोपाल मध्य प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.पुष्षराज हा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांचा तो चिरंजीव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *