स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाचे प्रणेते सदगुरु श्री चंद्रकांत मोरे दादा यांचे महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी महापौर दालनात केले स्वागत व सत्कार.
![]()
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाचे प्रणेते सदगुरु श्री चंद्रकांत मोरे दादा यांचे महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी महापौर दालनात केले स्वागत व सत्कार.


आज दिनांक 16/09/2023 रोजी श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास केंद्र, दिंडोरी प्रणीत ब्रम्हीभूत सदगुरु मोरे दादा यांचे नातू व परमपूज्य सदगुरु गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे जेष्ठ सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांनी धुळे महानगरपालिकेस महापौर दालनास स.11.00 वा भेट दिली. यावेळी महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांनी आदरणीय चंद्रकांत दादा यांचे स्वागत व सत्कार केला.
दादांनी धुळे महानगरपालिकेची जास्तीत जास्त भरभराटी होवो व जनतेची चांगली सेवा होवो असा सर्वांना आर्शीवाद दिला.
या प्रसंगी महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी, आयुक्त श्रीमती अमिता दगडे-पाटील, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर जयश्रीताई आहिरराव, सभागृह नेत्या भारतीताई माळी, माजी स्थायी समिती सभापती सुनिलभाऊ बैसाणे, नगरसेविका मंगलाताई पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल चौधरी, सचिव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना प्रा.सागर चौधरी भाजपाचे इतर पदाधिकारी व मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रसंगी श्री.व्दारकाधिश प्रतिष्ठानच्या वतीने अमोलभाऊ मासुळे यांनी गुरुमाऊली यांना श्रीकृष्ण यांची प्रतिमा भेट दिली.

