सम्राट अशोक विद्यालयात पारंपरिक बैल पोळा सण उत्साहात साजरा.
![]()



सम्राट अशोक विद्यालयात पारंपरिक बैल पोळा सण उत्साहात साजरा.
विद्यार्थ्यांनी शिववाहनाचे (बैलांना) सजवत मनोभावे पूजा पूजन केले.
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी : शेतकऱ्यांचे दैवत म्हणजे बैल. शेतकऱ्यांच्या या दैवताची पूजा ग्रामीण भागात बैल पोळा या सणाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने शेतकरी साजरा करतात. शहरी भागात बैलपोळा सण दुर्मिळ आहे परंतु कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात शिक्षक व विद्यार्थी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या कल्पकतेतून दरवर्षी बैलपोळा साजरा करतात.
यावर्षी कल्याण येथील कोन गावचे शेतकरी मुकुंद पावशे व बजरंग म्हात्रे यांची बैलजोडी शाळेत आणून शाळेच्या आवारात शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बैलांना सजवले. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी पूजा केली. बैलांचे महत्त्व सांगून बैलपोळा साजरा करण्याचा उद्देश यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. माझा आवडता सण विद्यार्थ्यांना निबंध विचारला जात असतो. केवळ पुस्तक वाचन करून नव्हे तर प्रात्यक्षिक सणाचा अनुभव घेऊन विद्यार्थ्यांनी निबंध लिहावा म्हणून वेगवेगळे सण शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत साजरे केले जात असतात असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सर्जा राजाच्या गीतावर शेतकरी नृत्य सादर केले.बैलपोळा कार्यक्रमाचा आनंद विद्यार्थ्यांसह पालकांनीही घेतला.
कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडें यांचासह सर्व शिक्षक,पालक यांनी उपस्थित राहून बैल पोळा पूजनाचा आनंद घेतला.

