1 min read

भिवंडी मनपाकडून तक्रारी करूनही बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात दिरंगाई.
आरोग्य विभागाला संतप्त नागरिकांचा सवाल?

Loading

भिवंडी मनपाकडून तक्रारी करूनही बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात दिरंगाई.
आरोग्य विभागाला संतप्त नागरिकांचा सवाल?
ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी )
भिवंडी महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ४ अंतर्गत राम नगर, वॉटर पंपजवळ, साठे नगर अंजूर फाटा या ठिकाणी बळवंत सिंग नामक बोगस डॉक्टर क्लीनिक काढून गरीब जनतेच्या जीवाशी खेळत असल्या बाबतची तक्रार श्री नारायण तुकाराम बसवंते, शशिकांत लक्ष्मण वरपे व स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक व आरोग्य अधिकारी यांचे कडे केली आहे.
तरी मात्र सदर तक्रारीची दखल भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभाग घेत नाही यामुळे प्रभाग समिती ४ अंतर्गत राम नगर, साठे नगर अंजुर फाटा येथील राहणाऱ्या रहिवाशांमध्ये आपण तक्रार करून देखील बोगस डॉक्टरांवर कारवाई का होत नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे,२०१८ ते २०२३ या पाच वर्षात अजून पर्यंत बोगस डॉक्टरांची नावे देऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे सर्व नागरिक हे संभ्रमात पडले आहेत, याचा अर्थ भिवंडी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग हा आपल्या जीवाशी खेळत आहे असाच म्हणायला वावगे ठरू नये असे स्थानिकांचे म्हणणे आहे त्यामुळे या स्थानिक नागरिकांना प्रशासक तथा आयुक्त यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून बोगस डॉक्टरांवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी केली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *