कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्विकृत सदस्यांना प्रमाणपत्र वाटप
![]()
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्विकृत सदस्यांना प्रमाणपत्र वाटप

ठाणे,भिवंडी दि.४ ( मनिलाल शिंपी)
मा.जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे कार्यालयाकडील प्राप्त मंजुरी नुसार भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६ उपसमित्या गठीत करून देशाचे केंद्रीय पंचायत राज मंत्री नामदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सदर उपसमित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या स्वीकृत सदस्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सभापती सचिन बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला होता.सदर समारंभात बांधकाम उपसमितीचे स्विकृत सदस्यपदी दयानंद पाटील,अनुज्ञप्ती उपसमितीचे स्विकृत सदस्यपदी विजयानंद पाटील,सेवक उपसमितीचे स्विकृत सदस्यपदी विलास रामचंद्र पाटील,विवाद उपसमितीचे स्विकृत सदस्यपदी डॉ.देवराज अनंत चौधरी, नियमन उपसमितीचे स्विकृत सदस्य पदी मुकेश भांगरे,उपबाजार उपसमितीचे स्विकृत सदस्यपदी मिठाराम पाटील यांची निवड जाहिर करून त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप सभापती सचिन बाळाराम पाटील आणि उप सभापती मनेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी बाजार समितीचे संचालक अनंता पाटील, श्रीराम पाटील , ज्ञानेश्वर पवार,मोहन म्हणेरा, सागर देसक, ख्वाजा भाई कुरेशी, मीराबाई गायखे, नीलम गणेश पाटील आणि सचिव यशवंत अनंत म्हात्रे तसेच बाजार समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

