1 min read

राजेंद्र पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

Loading

राजेंद्र पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

अमळनेर प्रतिनिधी-मंगरूळ माध्यमिक विदयालयाचे उपक्रमशील शिक्षक राजेंद्र पाटील यांनी शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.हिंदी अध्यापक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल नुकतीच रायबा बहुउद्देशिय संस्था धुळे यांनी घेतली.
सविस्तर माहिती अशी कि मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री राजेंद्र पाटील सर(राजु सर) तथा उपाध्यक्ष पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरांची पतपेढी अमळनेर यांना रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार माजी आमदार शरद पाटील धुळे व रायबा संस्थेचे प्रमोद पाटील व पदाधिकारी
यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सहपत्निक गौरविण्यात आले.
त्यांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, विश्वासराव पाटील, आर.डी.महाजन, शिक्षणाविस्तराधिकारी पी.डी.धनगर,मुख्याध्यापक संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे सचीव दिलीप पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर, जिल्हा प्रतिनिधी एन.आर.चौधरी, मनिष उघडे,मार्गदर्शक सोपान भवरे व हिंदी मंडळाचे पदाधिकारी तथा
सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सचीन साळुंखे व संचालक मंडळ, माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार पाटील, खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे, गणित मंडळाचे समन्वयक डी.ए धनगर, विज्ञान मंडळाचे समन्वयक डी के पाटील,शिवशाही फाऊंडेशनचे पदाधिकारी उमेश काटे,
ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,
मित्र परीवार यांनी अभिनंदन करत भावीवाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *