गणेश कार्यशाळा संपन्न
![]()
गणेश कार्यशाळा संपन्न


गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी
निर्धार (एक हात आपुलकीचा) संस्थे तर्फे आज रविवार 3 सप्टेंबर,२०२३, रोजी जोगेश्वरी पूर्व येथील अरविंद गंडभिर शाळेत शाडूच्या मातीचा गणपती बनविण्याची कार्यशाळा, माझ्या मनातील बाप्पा सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत संपन्न झाली. कार्यशाळेत १०५ जणांनी भाग घेतला. उद्घाटन ऋजूता दणाईत यांनी केले. कार्यशाळेला पहिल्या महिला मूर्तिकार गौरी प्रमोद परब आणि त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले. वय वर्षे ५ ते ६० वयोगटातील मुले, तरुणवर्ग, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. आपल्या हाताने मनातील बाप्पा साकारताना सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. कार्यशाळा झाल्यावर मार्गदर्शक टीमने उत्कृष्ट तीन मूर्तींची निवड करून विजेत्यांना पारितोषिके आणि प्रोत्साहनपर पारित़षिके देण्यात आली. असाच पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करा असे आवाहन मूर्तिकार गौरी परब पाटणकर यांनी केले. सहभाग घेतलेल्या सर्वांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले . असेच पर्यावरणपूरक उपक्रम या पुढे आयोजित करेल अशी ग्वाही या उपक्रमाचे संयोजक संजय पाकळे यांनी दिली.

