1 min read

सायकलची साथ ,साक्षीने बांधली इंग्लिशशी गाठ !!

Loading

सायकलची साथ ,साक्षीने बांधली इंग्लिशशी गाठ !!

अमळनेर शहरातील डी. आर. कन्या शाळेची विद्यार्थीनी साक्षी पाटील हिने 10 च्या इंग्लिश विषयात बोर्डात 94 गुण मिळवून तिन्ही संस्थेमधून प्रथम येण्याचा मान मिळविला. लोण या खेडयामधील विद्यार्थीनी आहे. आपल्या गरिब परिस्थितीमुळे ती आपल्या मामाकडे तासखेडयात राहायला आली. तासखेडयातून कन्या शाळेत शिक्षण घेत होती.
साक्षीने साई
अकॅडमित मगर सरांकडे क्लास लावला होता..क्लास साठी तीने तासखेडयातून सायकल प्रवास करून सुट्ट्यांच्या कालावधीत 2 महिने येऊन 10 वी च्या बोर्डात इंग्लिश विषयात 94 गुण मिळवून तिन्ही संस्थेत नाव कमविले. साई इंग्लिश क्लास चे संस्थापक भैय्यासाहेब मगर सर यांनी कु. साक्षी पाटील हिला योग्य मार्गदर्शन करुन इंग्लिश विषयाची तयारी करून घेतली. खेडयातून सायकलवर येत अगदी घामाने ओलेचिंब होत क्लास ला येत होती. सर्व मुले तीला साक्षी दिदी म्हणून हाक मारित..सर तिला म्हणायचे, “साक्षी ताई कष्टाचे शिक्षण घेत आहे ” तिला विश्वास बसत नव्हता परंतू निकाल आल्यावर साक्षीला मेहनतीने यश मिळवून दिले. साक्षीचा गुणगौरव करण्यात आला..साक्षीने मगर सरांना पेढे देतांना सांगितले ,”मी तुमची साक्षी ताई, भर ऊन्हात येणारी..” घेतलेल्या मेहनतीचे फळ, घातलेल्या घामाचे यशरुपी मोती तीच्या पदरात पडले. साक्षीने दाखवून दिले की, योग्य मार्गदर्शन मिळाले व जिद्द असेल तर तुम्ही यशाचे दरवाजे उघडू शकता..खेडयातही गुणवत्ता लपलेली आहे. त्या गुणवत्तेला वाव मिळाला तर विद्यार्थी आपली चमक दाखवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *