प्रताप महाविद्यालयात जागतिक उद्योजकता दिवस साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात जागतिक उद्योजकता दिवस साजरा

अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. ३१ ऑगस्ट रोजी जागतिक उद्योजगता दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते उद्योजक गणेश वाघ हे होते. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी उद्योजकतेला पर्यायी करिअर म्हणून निवडावे तसेच स्वावलंबी भारतासाठी उद्योजकता, प्रत्येकांसाठी उद्योजकता, स्टार्टअप इकोसिस्टम विकसित होणे ही काळाची गरज आहे” असे मत वक्ते यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. ए बी जैन म्हणाले की, “नावीन्यता व कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालय अशा नवोदित उद्योजकांना सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे” असे प्रतिपादन केले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. पराग पाटील यांच्यासह रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मिलिंद ठाकरे, प्रा. संतोष दिपके कार्यक्रमास इन्क्युबेशन अँड इनोव्हेटिव्ह समितीचे सर्व सदस्य व इतर प्राध्यापक वृंद यांनी सहकार्य केले.
रसायनशास्त्र विभाग प्रमुख व इन्क्युबेशन आणि इनोव्हेटिव्ह समितीचे समन्वयक
प्रा.डॉ. निलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.डॉ. रवी बाळस्कर यांनी मानले.

