1 min read

सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे संपन्न होणार…….

Loading

सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे संपन्न होणार…….

सत्यशोधक समाजाच्या 150 वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा. हरी नरके यांच्या स्मृती निमित्त

सत्यशोधक समाजाचे राज्य अधिवेशन दि. 24 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे आयोजित करायचे बहुमतानेने ठरले.
अधिवेशन संदर्भात पूर्वतयारीची पहिली बैठक नाशिक येथे दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी शहरातील सिटी भवन नगर येथे सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या प्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे राजाध्यक्ष अरविंद खैरनार,सुदर्शन जाधव, डॉ.डी.बी.शेंडे,राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे,अनिल भालेराव,दौलत शेलार,भाऊसाहेब जाधव,विश्वासराव पाटील,विधीकर्ते भगवान रोकडे,नरेंद्र जाधव,साळूबा पांडव,रामचंद्र सोनवणे,कैलास जाधव,विजय लुल्हे,रवींद्र तितरे, सुरेश डॉ.महाजन,अनिल माळी,प्रकाश महाजन,माळी सर,सपकाळे,रमेश वराडे,रमेश जगताप सर,स्वप्नील महाजन,रमेश बच्छाव,हेमंत जाधव,संजय पवार,चंद्रकांत चव्हाण,सागर मुंजवाडकर,मुकेश कापुरे,निकम नाना,उमेश उबाळे प्रकाश बागुल ,एकनाथ सोनवणे,राजेंद्र दरोडे,सुनील देवरे,अशोक मंडलिक,भारत जाधव,मनोहर शेलार,गोविंदराव सोनवणे,सुरेश आहिरराव,कैलास खैरनार सर,यशवंत जाधव,रमेश खैरनार,प्रा.वसंतराव गोवर्धने,प्रा.अशोक सोनवणे,म.फुले समता परिषदेचे संतोष पुंड विस्तार अधिकारी डी.पी.निकुंभ सर,सत्यशोधक प्रा.डॉ.भोज आदी मान्यवर नियोजन बैठकीला उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ.सुरेश झाल्टे ,सूत्रसंचालन आप्पा जगताप व आभार प्रदर्शन सिटू जिल्हा सरचिटणीस सतिश खैरनार यांनी केले .
मिटिंग यशस्वीतेसाठी जयराम सोनवणे,श्रीराम सोनवणे,संदीप बच्छाव यांनी परिश्रम घेतले. सदर बैठकीसाठी नाशिक, धुळे,नंदुरबार,जळगाव औरंगाबाद,अहमदनगर,पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
संमेलनाचे प्रारूप पुढील प्रमाणे ठरविण्यात आले.
➡️ उदघाटन
➡️ प्रथम सत्र :- व्याख्यान – निसर्गवासी प्रा.हरी नरके यांचे सत्यशोधकीय कार्य
➡️ दुसरे सत्र – परिसंवाद ‘ सत्यशोधक समाजाची चळवळ काळाची गरज ‘➡️ तिसरे सत्र :- व्याख्यान – ‘ वर्तमानातील शेतकरी,शैक्षणिक धोरण व त्यात सत्यशोधक चळवळीची भूमिका
सदर अधिवेशन यशस्वी होण्यासाठी राज्यातील सर्व परिवर्तन संघटनांची मदत घेऊन व सहयोगाने हे अधिवेशन यशस्वी करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *