प्राध्यापक भरती होणारच – प्रोफेसर डॉ दिलीप अर्जुने (अध्यक्ष महाराष्ट्र शैक्षणिक महासंघ छत्रपती संभाजी नगर),प्राध्यापक भर्ती संदर्भात कुलगुरूनां साकङे, संघटनेचे पदअधिकारी अँक्शनमोङवर
![]()
प्राध्यापक भरती होणारच – प्रोफेसर डॉ दिलीप अर्जुने (अध्यक्ष महाराष्ट्र शैक्षणिक महासंघ छत्रपती संभाजी नगर)
(प्राध्यापक भर्ती संदर्भात कुलगुरूनां साकङे, संघटनेचे पदअधिकारी अँक्शनमोङवर)

वाळुजमहानगर/ संजय काळे- अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ सलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षणिक संघ यांच्या वतीने आज (दि30) रोजी कुलगुरू यांना निवेदनाद्वारे प्राध्यापक भरती चालू ठेवावी यासाठी निवेदन देण्यात आले आहेत अध्यक्ष प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने यांनी असे सांगितले आहे की, आम्ही आपल्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो की, मराठवाडा विभाग हा महाराष्ट्रातील अत्यंत मागासलेला प्रदेश आहे.या मातीत जन्म घेतलेले अनेक तरुण-तरुणी गुणवत्तेच्या शिखरापर्यंत पोचलेली आहेत, परंतु उच्चविद्या घोषित असूनही शासनाच्या धोरणामुळे नोकरीचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे बहुजनांच्या मुलांना जगण्याची वाट दाखवणारे विद्यापीठ आहेत याच विद्यापीठात १४ वर्षानंतर ७२ प्राध्यापक पदांच्या भरतीची मान्यता महाराष्ट्र शासनाने दिली आहे, आणि विद्यापीठ प्रशासनाने ती जाहिरात प्रकाशित केलेली आहे, अधिकार मंडळातील अनेक इच्छा हीच होती की मा. कुलगुरू प्रोफेसर (डॉ) प्रमोद येवले यांच्या कार्यकाळात ही भरती झाली पाहिजे तर पारदर्शकपणे होऊ शकते, व त्यासाठी प्रशासन प्रचंड प्रमाणात मेहनत घेत आहेत परंतु काहीही संबंध असणाऱ्या मंडळीचा या भरतीत प्रक्रियेला विरोध आहे त्यांचे म्हणणे शंभर टक्के चुकीचे असून जर ही भरती प्रक्रिया यावेळेस झाली नाही तर भविष्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेत भरती प्रक्रिया कोलंबलेल आणि भरती प्रक्रिया होणारच नाही त्यामुळे एन इ पी २०२० ची राबवण्याची हा मोठा प्रश्न विद्यापीठ प्रशाला सामोरे उभा टाकणार आहेत त्यासाठी ही भरती प्रक्रिया संगीत कन्याऐवजी पारदर्शक करण्यासाठी प्रशासनास सांगावे व भरती प्रक्रिया लवकरात लवकर
राबविण्यात यावे असे आदेश विद्यापीठ प्रशासनाला द्यावेत ही नम्र विनंती नवीन शैक्षणिक धोरण जर राबवायचे असतील तर प्राध्यापक भरती करावीच लागेल.
प्रतिक्रिया *
प्राध्यापक भरती जर झाली नाही तर नवीन शैक्षणिक धोरण व गुणवत्ता कशाच्या बळावर वाढवण्यात येईल विद्यापीठांमध्ये ७२ पदांची भरती सुरू झाली असून विरोधकांना यातलं काहीही माहीत नसतानाही भरतीला विरोध करणे म्हणजेच बेरोजगार प्राध्यापकांच्या पोटावर पाय देणे असे आहे प्राध्यापक भरती सुरळीतपणे पार पडलीच पाहिजे
डॉ भरतसिंग सलामपुरे दगङोजी देशमुख महाविद्यालय,वाळुज
संघटनेच्याप्रतिक्रिया – प्राध्यापक भरती सुरू करण्यासाठी व मान्यता घेण्यासाठी विद्यापीठाला चार वर्षाचा कार्यकाल लागला व जाहिरात प्रसिद्ध झाली याचा बेरोजगार प्राध्यापकांना आनंद आहे व काही लोकांनी चुकीची भूमिका मांडली आहे याचा विरोध करता प्राध्यापक भरती ही पारदर्शकपणे झालीच पाहिजे आणि ती म्हणजे कुलगुरू प्रोफेसर डॉ प्रमोद येवले यांच्या काळातच होऊ शकते हेही सत्य आहे.
- प्रोफेसर डॉ दिलीप अर्जुने अध्यक्ष महाराष्ट्र शैक्षणिक महासंघ छत्रपती संभाजीनगर.

