1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्प्याटप्पाने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सप्टेंबर महिन्याची प्रतिक्षा
![]()
1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्प्याटप्पाने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सप्टेंबर महिन्याची प्रतिक्षा
त्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेऊन पेन्शन पिडीत शिक्षकांना दिलासा द्यावा
शिक्षक आमदारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांना साकळे
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिटींग आयोजित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेली राज्यातील 22000 हजार कर्मचारी पेन्शन पासून वंचित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये पेन्शन पीडित बंधू आणि आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत केस टाकली आहे पण सुप्रीम कोर्टाने मागच्या आठवड्यात सरकारला फटकारले आहे. सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख दिलेली आहे. यात कर्मचारी 2005 पूर्वी नियुक्त आहेत..शासनाने 2005 नंतर पेन्शन बंद केली.. टप्प्याटप्प्याने अनुदान देणे हे सरकारचे धोरण आहे. विनावेतन कर्मचाऱ्यांनी पाच-सहा वर्ष अध्यापन केले,सरकारचा पैसा वाचवला,
यात कर्मचारी भरडला गेला आणि कर्मचारी सेवानिवृत्त होऊन पेन्शन नसल्यामुळे वेगवेगळे व्यवसाय करीत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचा परिवार आज आर्थिक संकटात आहे.
सुप्रीम कोर्टातच कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल… ही काळ्या दगडावरची रेष आहे… असे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे पण याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार यांनीच कर्मचाऱ्यांना जुनीपेन्शन घोषित केली तर येणाऱ्या निवडणुकीत पेन्शन पीडित कर्मचारी सरकारच्या बाजूने उभे राहतील हे तेवढेच सत्य आहे.. यासाठी शिक्षक आमदार,पदवीधर आमदार व पेन्शन संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे व त्यांचे पदाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे.
पुणे येथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथ शिंदे साहेब (बालेवाडी) येथे येणार आहेत हे समजल्यानंतर लवकरात लवकर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदर राज्य शासनाने GR काढावा यासाठी पाठपुरावा व्हावा म्हणून आपल्या पेन्शन साठी रात्रीचा दिवस करणारे, लोकप्रिय आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ )व श्री जयंत आसगावकर पुणे शिक्षक मतदार संघ यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला
लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी राज्य शासनाने GR काढावा यासाठी आज पाठपुरावा करण्यात आला व तसेच निवेदन देण्यात आले
यावेळी आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवेदन प्रत्यक्ष मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे स्टेजवर दिले व ४ किंवा ५ तारखेला मीटिंग आयोजित करा असे श्री आमदार महोदय म्हटले
मुख्यमंत्र्यांची मीटिंग संपल्यानंतर दोन्ही आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सर व जयंत आसगावकर सर यांना कोर्टातील माहिती श्री संजय वाळे यांनी दिली
श्री सचिन नलवडे (सातारा) श्रीआनंदराव गर्जे (पुणे) श्री विजयराव येवले (सातारा) व श्री आण्णासाहेब गायकवाड (सोलापूर) म्हटले की पीडित बांधव किंवा तुम्ही दोघांनी जरी आमची बाजू मांडली तरी चालेल पण लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाच्या अगोदर आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे*
यावेळी श्री.कृष्णदेव बेहेरे, रेवन अवताडे ,रामचंद्र जानकर इत्यादी शिक्षक उपस्थित होते


