1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्तांबरोबर बैठक
अनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, शिक्षक हवालदील-––-

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्तांबरोबर बैठक
अनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, शिक्षक हवालदील-–––————————————–
मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी),अनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, हवालदील झालेल्या शिक्षक बांधवांसाठी, त्यांच्या भावना लक्षात घेऊन अहोरात्र मेहनत करणारे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब, शिक्षण संचालक सूर्यवंशी साहेब,उपायुक्त पानझडे साहेब, सहशिक्षणण संचालक हरुण अत्तार साहेब यांच्यासमवेत पुणे या ठिकाणी बैठक घेतली.6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयातील शिक्षक शिक्षकेतरांच्या वैयक्तिक मान्यतेवरील जावक नंबर जुळत नसतील तर 11 पैकी सहा मुद्दे तपासून अनुदान आदेश द्यावा, एफ आय आर ची अट बाजूला ठेवावे.

शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येची अट शिथिल करावी.
40 , 60%टक्के अनुदान घेणाऱ्या शाळांच्याकाही बाबतीत न पाहता पुढील वाढीव टप्पा द्यावा इत्यादी विषयांबाबत विधान भवनात आमदारान समवेत जी बैठक झाली होती, त्याचे बैठकीचे इतिवृत्त आले नव्हते ते मंत्रालयातून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी दिनांक 22 व 23 ऑगस्ट रोजी टेबल टू टेबल पाठपुरावा करून इतिवृत्त आयुक्तांकडे पाठवण्यासाठी धडपड केली, सदर इतिवृत्त आयुक्तांकडे आल्यानंतर पुढील कारवाई काय झाली , हे पाहण्यासाठी आज वरील विषयांसाठी आयुक्तांबरोबर बैठक घेतली,
आयुक्तांना इतिवृत्त प्राप्त अजून झाले असून , सदर इतिवृत्तातील मुद्दे शिफारशी सह तात्काळ मंत्रालय पाठवतो असे त्यांनी सांगितले, सदर मुद्द्यांच्या आधारे सुटसुटीत किचकट नसलेले अट शिथिल करण्याचे वरील मुद्द्यांचे पत्र लवकरच आठवड्या भरात येईल ,अनेक दिवसापासून रखडलेले अनुदान शिक्षकांच्या खात्यामध्ये 1 जानेवारी पासूनच येईल, असे आयुक्तांनी आश्वासित केले.
अनेक वर्षापासून प्रलंबित संच मान्यता दुरुस्ती व नव्याने तयार होणाऱ्या संचमान्य मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी केलेल्या तक्रारीनुसार नवीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे, लवकरच राज्यातील सर्व प्रलंबित संच मान्यता शाळांना मिळतील.
राज्यातील अल्पसंख्यांक शाळांना शिक्षक भरतीसाठी परवानगी लवकरच मिळेल.
पुणे विभागातील ज्युनिअर कॉलेज प्रलंबित शालार्थ आयडी तात्काळ मिळतील.
अनेक शाळांमध्ये रिक्त असलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाकडून विशेष बाब म्हणून प्रयत्न केला जाणार आहे उच्च न्यायालयात असलेल्या केस व्यतिरिक्त
राज्यातील 40, 60% अनुदान आलेल्या शाळांचा पगार गेल्या दोन महिन्यापासून झालेला नाही,तात्काळ कारवाई झाली पाहिजे.
डीएड महाविद्यालयाचे काही प्रश्न होते ते एसएससी बोर्डाचे अध्यक्ष माननीय श्री शरद गोसावी साहेब व परीक्षा परिषदेच्या सचिव श्रीमती ओक मॅडम यांच्याशी चर्चा करून सोडवण्यात आले.
सोबत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुभाष माने सर, सोलापूरचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने सर, सुनील जगताप सर, डीएड संघटनेचे श्री जोपाळे सर त्यांचे पदाधिकारी तसेच शैक्षणिक समस्या घेऊन आलेले शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *