भूषण माळी यांची SSC GD मार्फत ITBP पॅरा मिलिटरी मध्ये निवड झाल्याबद्दल कुटुंबाचा झाला सत्कार
![]()





भूषण माळी यांची SSC GD मार्फत ITBP पॅरा मिलिटरी मध्ये निवड झाल्याबद्दल कुटुंबाचा झाला सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी भूषण रवींद्र माळी याची Staff Selection Commission (SSC) द्वारा ITBP मध्ये GD Trade साठी निवड झाली.
त्याचे अभिनंदन सर्वत्र होत आहे. देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक आय.आर महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी यांनी भूषणच्या घरी जाऊन सहकुटुंब परिवाराचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भूषण चे आजोबा देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व माजी सरपंच नवलदादा पाटील,वडील रविंद्र पाटील व आई उपस्थित होत्या.
मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की देवगाव देवळी येथील अनेक माजी विद्यार्थी जिद्द ,चिकाटी, मेहनतीच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत व येणाऱ्या काळात अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक करून गावाचा व शाळेचे नाव राज्यपातळीवर नावलौकिक करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

