मेस्टा इंग्रजी माध्यम संघटने कडून शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा सन्मान
![]()

मेस्टा इंग्रजी माध्यम संघटने कडून शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा सन्मान
*महाराष्ट्र राज्यातील स्वयं अर्थसहित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25 % मोफत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे प्रतिपूर्ती शुल्क गेल्या तीन-चार वर्षापासून शाळांना प्राप्त झालेे नाहीत, त्यामुळे अनेक स्वयंअर्थ सहित शाळांवर आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहे, याकरता कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सदरची थकीत प्रतिपूर्ती शुल्क शाळांना त्वरित मिळाले म्हणून आवाज उठवला होता, त्यानुसार शासनाकडून थकीत प्रतिकृती शुल्काची माहिती सर्व शाळांकडून मागून घेतलेली असून पुढील कार्यवाही सुरू झालेली आहे. लवकरच शाळांना प्रतिपूर्ती शुल्काचे पैसे मिळतील म्हणून मेस्टा संघटनेच्या वतीने शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आमच्यासाठी विधिमंडळामध्ये आवाज उठवला म्हणून, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरांची भेट घेऊन सरांचा सन्मान केला व आभार व्यक्त केले,* *तसेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे अनुदानित, विनाअनुदानित, आणि स्वयंअर्थसाहित शाळांच्या अडीअडचणीमध्ये "नेहमीच धावून येणारा एक मसिया आहे," असे मत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना प्रति संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले व आनंद व्यक्त केला* *याप्रसंगी ठाणे जिल्हा संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी तसेच मेष्टा संघटनेचे कोकण विभाग व ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत*

