महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांचे धुळेकर जनतेस आढावा बैठकीत आवाहन तसेच एलईडी पथदिवे व स्थापत्य कर कन्सल्टींग ठेकेदारांवर कडक कारवाईचे प्रशासनास निर्देश
![]()
महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांचे धुळेकर जनतेस आढावा बैठकीत आवाहन तसेच एलईडी पथदिवे व स्थापत्य कर कन्सल्टींग ठेकेदारांवर कडक कारवाईचे प्रशासनास निर्देश

धुळे शहरातील विद्युत पथदिव्यांचा प्रश्न व त्या संबंधात नागरिकांच्या तक्रारी याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी महापौर सौ. प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांच्या दालनात आज दि.18/08/2023 रोजी सायंकाळी 05.00 तातडीची बैठक आयोजित केली होती. यात विद्युत पथदिवे पुरवठाधारकाने देयका अभावी पथदिवे पुरवठा व देखभाल दुरुस्ती बंद केल्याने अडचणी निर्माण झालेल्या होत्या तसेच पुढील कालावधीत येणारे सण उत्सव पाहता याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने आज दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी आपले दालनात निर्माण झालेल्या समस्यांबाबत तातडीची बैठक आयोजित केली. धुळे महानगरात नव्याने 11 गावे समाविष्ट झाल्याने एलईडी पथदिव्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच येणारे उत्सव शहरात लाईट पुरवठा धारकाने पुरवठा बंद केल्याने लाईटची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागात बंद लाईटाच्या तक्रारींना नगरसेवकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नगरसेवक व नागरीकांध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. सदर बैठकीत आयुक्त श्री देविदास टेकाळे, नगरसेवक श्री सुनील बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. गोपीचंद नाना पाटील, श्री बंटी भाऊ मासुळे,
तसेच थकीत पाणी पट्टी बाबत बैठक होऊन मुल्य निर्धारक कर संकलन अधिकारी श्रीमती. पल्लवी शिरसाठ, उपस्थित होते. या बैठकीत घरपट्टी वसुली व पाणीपट्टी वसुली संकलनावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा. तसेच सोमवार पासून घरपट्टी वर शास्ती माफ सुरु करण्यात येणार आहे व पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहिम राबविण्यात यावी असे आदेश आयुक्त श्री.देविदास टेकाळे यांनी मुल्य निर्धारक कर संकलन अधिकारी श्रीमती पल्लवी शिरसाठ यांना दिले.
शहरातील अत्यावश्यक प्रश्नांमध्ये आजतागायत वल्लभ इलेक्ट्रीकल्स पथदिवे ठेकेदार यांना 6 कोटी तसेच स्थापत्य कर कन्स्ल्टींग अमरावती यांना 6 कोटी आजतागायत अदा करण्यात आलेले आहेत. तरी देखील सदर दोन्ही ठेकेदार कामात दिरंगाई मनपाची अडवणूक आणि आर्थिक नुकसान करीत आहे. यामुळे सदर दोन्ही ठेकेदारांवर कडक कार्यवाही करण्याचे त्यासंदर्भाचे आदेश महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी संबंधितांना दिलेले आहेत.
तसेच याबाबत प्रशासनाने काही कुचराई केल्यास तसेच भविष्यात नागरीकांचा रोष वाढल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निर्देश महापौर सो यांनी दिले.

