1 min read

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीपदी रवींद्र मोरे यांची निवड

Loading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीसपदी रवींद्र मोरे यांची निवड

अमळनेर प्रतिनिधी : येथील पत्रकार रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीस पदी नुकतिच निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंंडे, राज्य संघटक संजय भोकरे, महाराष्ट्र राज्याचे महासचिव विश्वासरावजी आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणजी सपकाळे, खानदेश विभागीय अध्यक्ष किशोरजी रायसाकडा यांच्या मान्यतेने रवींद्र मोरे यांची पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
रवींद्र मोरे हे व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष देखील आहेत.
दोन्ही संघटनांच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी व संघटना वाढीसाठी ते संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि जेष्ठ पत्रकार तथा मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने कार्य करणार असल्याने त्यांनी सांगितले.
रवींद्र मोरे यांना दै. लोकमत मधील पत्रकारितेचा सुमारे २० वर्षाचा अनुभव असून त्यापैकी त्यांनी ६ वर्ष उपसंपादक म्हणून कामही पाहिले आहे. एवढ्या प्रदीर्घ वर्षांच्या अनुभवानुसार त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून दै. ‘अमळनेर दर्पण’ ची सुरूवात केली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव व कार्य पाहता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *